एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या भेटीला, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, राजकीय चर्चांना उधाण
माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली.
मुंबई : माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली. ही भेट नियोजित होती, तसेच दोघांमध्ये सकाळी 10.45 ते 11.15 दरम्यान अर्धा तास चर्चादेखील झाली.
सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना सचिनने घेतलेल्या या भेटीचा अनेक जण राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. सचिन आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. खासगी कारणांसाठी ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार आणि सचिन तेंडुलकर या दोघांची चांगली मैत्री आहे. तसेच शरद पवार हे क्रिकेटशी नेहमी जोडलेले असतात. ते क्रिकेटचे चाहतेदेखील आहेत. 2010 ते 2012 दरम्यान शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे (आयसीसी)अध्यक्ष होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement