एक्स्प्लोर
तरुणीकडून आमदार जितेंद्र आव्हाडांसमोर तरुणाला चोप
ठाणे : ठाण्यात एका सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीने तरुणाला चोप दिला आहे. या तरुणावर छेड काढल्याचा आरोप करत तरुणीने मारहाण केली आहे. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर झाला आहे.
कायदा पायदळी तुडवला जात असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र गप्प राहणं पसंत केलं. उलट तरुणीला मारहाण करण्यासाठी आव्हाड प्रोत्साहित करताना दिसत आहेत. संबंधित तरुणावर तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे.
हा प्रकार जितेंद्र आव्हाड यांना कळाल्यानंतर त्यांनी तरुणाला आपल्या कार्यालयात बोलावून घेतलं आणि तरुणीला मारहाण करण्याची सूचना केली. खरंतर आव्हाडांनी या तरुणाला पोलिसाच्या हवाली देणं आवश्यक होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे कायदा बनवणारेच कायदा पायदळी तुडवत असतील तर कायद्याचा धाक कसा राहील, हा प्रश्नच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement