एक्स्प्लोर

Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?

Abhijeet Dipke on PM Modi: मोदी यांच्या सेल्फी-स्टाईल व्हिडिओवर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पीएम मोदींच्या या व्हिडिओवर इन्स्टाग्रामवर खोचक कमेंट करत टोला लगावला.

Abhijeet Dipke on PM Modi: संसदेत 'सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक 2026' (Anti-Paper Leak Bill) मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर काल रात्री (30 जुलै) चौथा सेल्फी-स्टाईल व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी सांगितले की, हे विधेयक एक पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे आणि पेपर लीक करणाऱ्या माफियांची खैर केली जाणार नाही.

तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा जास्त चमकदार

मोदी यांच्या सेल्फी-स्टाईल व्हिडिओवर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पीएम मोदींच्या या व्हिडिओवर इन्स्टाग्रामवर खोचक कमेंट करत टोला लगावला. त्यांनी लिहिले की, तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा जास्त चमकदार आहे. दरम्यान, यापूर्वी अभिजित दीपके यांनी केवळ कायदे करून पेपर लीक थांबणार नाहीत, तर अंमलबजावणी आणि सरकारची नीती स्पष्ट असणे गरजेचे आहे असे म्हटले होते. त्यांनी आधी असाही सल्ला दिला होता की, पंतप्रधान मोदींनी पद सोडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनावे. याआधीही CJP ने आरोप केला होता की हे विधेयक पेपर लीक रोखण्यापेक्षा लीक झाल्यानंतर शिक्षा देण्यावर जास्त लक्ष केंद्रित करते.

Dipke's comment on PM's latest selfie video.

कालच्या व्हिडिओत मोदी काय म्हणाले? 

मोदी यांनी सांगितले की, आम्ही संसदेत एक विधेयक आणले होते, आणि मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी, बहुसंख्य आदरणीय खासदारांच्या उपस्थितीत, गेल्या दोन दिवसांपासून त्यावर सविस्तर चर्चा केली आहे, आणि आज दोन्ही सभागृहांनी कठोर कायदे आणि तरतुदींसह हे विधेयक मंजूर केले आहे. आता, एका विश्वासार्ह परीक्षा प्रणालीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या दिशेने वाटचाल करण्यात यश आले आहे. हे कार्य पुढेही चालू राहील. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

त्यांनी सांगितले की, मित्रांनो, एक विश्वासार्ह परीक्षा प्रणाली सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एकामागून एक पावले उचलत आहोत. मग ते कार्यदलाची (टास्क फोर्सची) निर्मिती असो, जलदगती दृष्टिकोनाची (फास्ट-ट्रॅक अप्रोचची) निर्मिती असो, राज्यांकडून आलेल्या सूचनांचा विचार करणे असो. कारण गेल्या अनेक दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार अशा प्रकारच्या पेपरफुटीशी झुंज देत आहे. यामुळे मुलांचे भविष्यही धोक्यात येत आहे. हे सर्व लक्षात घेता, देशभरात, सर्व राज्यांमध्ये आणि केंद्र पातळीवरही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे.  त्यांनी पुढे सांगितले की, तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणे आवश्यक झाले आहे. आणि त्याच वेळी, कोणताही पेपर माफिया, कोणतीही पेपरफुटी करणारी टोळी, देशाच्या मुलांच्या भविष्याशी खेळणारी कोणतीही टोळी असेल त्यांना पुन्हा सोडले जाणार नाही. अशा कठोर कायद्यांचीही गरज आहे. ही परिस्थिती जास्त काळ टिकू देणार नाही, या विश्वासाने मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वजण खांद्याला खांदा लावून एकत्र काम करूया, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena UBT: आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget