(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रिलायन्स जिओने वेळेआधीच दिले स्पेक्ट्रमचे पैसे; मुकेश अंबानींनी वाचवले 1200 कोटी रूपये
रिलायन्स जिओ इन्फोकॉम (RJIL) ने दूरसंचार विभागाला 30 हजार 791 कोटो रूपये भरले आहेत. वेळेआधीच या रक्कमेची परतफेड केल्याने जिओची तब्बल 1 हजार 200 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
Reliance Jio Infocomm Ltd : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम (RJIL) ने दूरसंचार विभागाला 30 हजार 791 कोटो रूपये भरले आहेत. जिओने लिलावात घेतलेल्या स्पेक्ट्रमचे संपूर्ण पैसे वेळेपूर्वीच भरले आहेत. त्यामुळे जिओचे तब्बल 1200 कोटी रूपये वाचले आहेत.
Jio ने 2014, 2015, 2016 मध्ये स्पेक्ट्रमची खरेदी केली होती. त्याबरोबरच 2021 मध्येही Jio ने Bharti Airtel Limited कडून स्पेक्ट्रम विकत घेतले होते. त्याची सर्व रक्कम जिओने दिली आहे. या लिलावात जिओने 585.3 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले होते.
दूरसंचार कंपन्यांसाठी डिसेंबर 2021 मध्ये दूरसंचार विभागाकडून पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये रक्कम भरण्याच्या काही अटी देण्यात आल्या होत्या. परंतु, जिओने 2016 मध्ये घेतलेल्या स्पेक्ट्रमशी संबंधित पेमेंटचा पहिला हप्ता ऑक्टोबर 2021 मध्येच भरला होता. 2014 आणि 2015 मधील लिलावामध्ये घेतलेल्या स्पेक्ट्रमची संपूर्ण रक्कम आणि ट्रेडिंगद्वारे घेतलेल्या स्पेक्ट्रमची रक्कम जानेवारी 2022 मध्ये जिओने मुदतीपूर्वीच भरली आहे.
ही रक्कम 2022-23 ते 2034-2035 च्या आर्थिक वर्षापर्यंत वार्षिक हप्त्यांमध्ये भरायची होती. त्यावर 9.30 टक्के ते 10 टक्के व्याज लागण्याचा जिओचा अंदाज होता. परंतु, वेळेआधीच या रक्कमेची परतफेड केल्याने वर्षाला तब्बल 1 हजार 200 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकतात रोबोटिक्स स्टार्टअप Addverb Technologies मधील 54 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल युनिट रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड मार्फत हा करार करण्यात आला आहे. रिलायन्स रिटेलने हा करार 985 कोटी रुपयांना केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Reliance : रिलायन्स उद्योगसमूहाची सूत्रे लवकरच नव्या पिढीकडे; मुकेश अंबानी यांचे संकेत
- Reliance : अमेरिकेनंतर अंबानींची न्यूयॉर्कमध्ये नवीन मालमत्ता, पंचतारांकित मँडरिन हॉटेलची खरेदी, किंमत ऐकून व्हाल थक्क
- Welcome to India! Intel भारतात करणार सेमीकंडक्टर निर्मिती