एक्स्प्लोर
मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाय काय?, आर.जे. मलिश्काचं भन्नाट गाणं

मुंबई : सध्या 'सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय?' हे गाणं सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या भाषेत जोरदार गाजतंय. मात्र नेहमी मुंबईच्या प्रश्नावर परखडपणे मतं मांडणारी रेडिओ जॉकी मलिश्कानं मुंबईकर आणि बीएमसीवर सोनूच्या चालीवर भन्नाट गाणं तयार केलंय.
गेल्या काही दिवसांपासून सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय या गाण्यानं सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे. तरुणांचे अनेक ग्रुप हे गाणं मिश्किल पद्धतीनं शूट करुन, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत आहेत. त्याच धरतीवर रेडिओ जॉकी मलिश्कानं मुंबईतल्या समस्या आणि मुंबईचा पाऊस या गाण्यात गुंफला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे.
रेडिओ जॉकी मलिश्का ही रेड एफएम या खासगी रेडीओ वाहिनीची सूत्रसंचालिका आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लगे रहो मुन्ना भाई' या सिनेमासाठी विद्या बालनला रेडिओ जॉकीचं प्रशिक्षण दिल्याने ती सर्वाधिक चर्चेत आली. शिवाय 'झलक दिखला जा' या टीव्ही रिअलिटी शोच्या सातव्या पर्वतही ती सहभागी झाली होती.
मलिश्कानं तयार केलेलं भन्नाट गाणं पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
