एक्स्प्लोर
“राजीनामा खिशात, फक्त पक्षप्रमुखांचा आदेश हवा”
मुंबई : शिवसेना मंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ‘वर्षा’ बंगल्याबाहेर आल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी राजीनाम्याचं पत्रच दाखवलं.
नोटीस पिरेड सुरु आहे का, असा प्रश्न शिवसेनेच्या मंत्र्यांना विचारल्यावर, दिवाकर रावते म्हणाले, नोटीस पिरेड सुरु आहे, हे आधीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
“आम्ही सर्व मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरतो आहोत. आम्हाला फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश हवा.” असे सांगत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राजीनाम्याचं पत्रच खिशातून काढून दाखवलं.
संबंधित बातमी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सेना मंत्र्यांची फौज ‘वर्षा’ बंगल्यावर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement