एक्स्प्लोर
निरुपमांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी : सूत्र
आमदार नसिम खान, अमिन पटेल, एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, सुरेश शेट्टी, कृपाशंकर सिंग यांच्यासह अन्य नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे ही मागणी केली.
मुंबई : काँग्रेसचे विद्यमान मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवून त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करावं, यासाठी काँग्रेस नेते आक्रमक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. यासाठी मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे मागणी केली.
मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस नेत्यांनी मुंबईत भेट घेतली. यामध्ये आमदार नसिम खान, अमिन पटेल, एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, सुरेश शेट्टी, कृपाशंकर सिंग, भाई जगताप आणि गुरुदास कामत गटाच्या इतर नेत्यांचा समावेश होता.
जनार्दन चांदूरकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, नवा अध्यक्ष कोण याबाबत निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी घेतील. गुरुदास कामत यांच्या निधनानंतर मुंबई काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे, असं चांदूरकर म्हणाले.
दरम्यान, संजय निरुपम यांचा मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता.
संजय निरुपम यांच्या एकला चलो रे च्या भूमिकेमुळे अनेक दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement