एक्स्प्लोर
Advertisement
अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार गडगडला, मुकेश अंबानींचं 9333 कोटींचं नुकसान!
शेअर बाजारातील सोमवारच्या घसरणीमुळे गुतवणूकदारांना एकूण 2.97 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
मुंबई : अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी (6 जानेवारी) मोठी घसरण झाली. यामुळे बीएसई सेन्सेक्स 788 अंकांनी गडगडला. या घसरणीमुळे सामन्य गुतंवणूकदारांचं नुकसान तर झालं, सोबतच देशाचे सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंटस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना एकाच दिवसात 9333 कोटी रुपयांचं (1.3 अब्ज डॉलर) नुकसान झालं आहे.
मुकेश अंबानी यांच्याशिवाय शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही सोमवारी केवळ एकाच दिवसात सुमारे 136 कोटी रुपये (1.9 अब्ज डॉलर) गमावले.
पश्चिम आशियात असलेल्या संकटाच्या शक्यतेचे परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसले. सर्वच क्षेत्र लाल निशाण्यावर होते. सोमवारी व्यवहारादरम्यान बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये घसरण होऊन तो चार महिन्याच्या निचांकी स्तरावर (40613) पोहोचला. तर राष्ट्रीय निर्देशांक निफ्टी 12 हजारांपेक्षाही खाली गेला. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 787.98 अंक म्हणजेच सुमारे 1.90 टक्क्यांनी घसरुन 40,676.63 वर बंद झाला.
यामुळे भारताच्या अनेक दिग्गज उद्योजक-व्यापाऱ्यांच्या खासगी संपत्तीतही जबरदस्त घसरण झाली. फोर्ब्स रिअल टाईम बिलिअनेरी इंडेक्सनुसार, RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2.2 टक्के म्हणजेच 1.3 अब्ज डॉलर (सुमारे 9333 कोटी रुपये) घसरण झाली. त्यांच्या एकूण संपत्तीत घट होऊन 57.6 अब्ज डॉलर राहिली आहे. अशाचप्रकारे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची खासगी संपत्तीत 0.75 टक्के म्हणजेच 1.9 कोटी डॉलर (सुमारे 136 कोटी रुपये) घसरण झाली आहे.
गुंतवणूकदारांना 2.97 लाख कोटी रुपयांचा फटका
शेअर बाजारातील सोमवारच्या घसरणीमुळे गुतवणूकदारांना एकूण 2.97 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारातील भांडवलात कपात होऊन 153.90 लाख कोटी रुपयेच राहिलं आहे. याआधी हे भांडवल 156.87 लाख कोटी रुपये होतं. सोमवारी आशियातील सर्व प्रमुख बाजारात घसरण पाहायला मिळाली. टोकिओच्या निक्केई 225, दक्षिण कोरियाच्या कोस्पी आणि S&P ASX 200 मध्ये घसरण झालेली दिसली.
आंतरराष्ट्रीय तणाव का?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरुन शुक्रवारी (3 जानेवारी) इराकच्या बगदादमध्ये एअर स्ट्राईक झाला. त्यात इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. यानंतर अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत आणि सोन्याचे दर विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement