एक्स्प्लोर
फ्रीज कम्प्रेसरचा स्फोट, नवी मुंबईत माहेरवाशिणीचा मृत्यू
प्रिती स्वयंपाकघरात जेवण तयार करत असताना गॅस स्टोव्हमधील उकळतं तेल गॅस पाईपवर उडालं. त्यामुळे आगीचा भडका उडाला
नवी मुंबई : फ्रीजच्या कम्प्रेसरचा स्फोट झाल्यामुळे 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईतील ऐरोली भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजस्थानची प्रिती परमार माहेरी राहायला आली असताना हा अपघात घडला.
प्रिती स्वयंपाकघरात जेवण तयार करत असताना गॅस स्टोव्हमधील उकळतं तेल गॅस पाईपवर उडालं. त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि फ्रीजच्या कम्प्रेसरचा स्फोट झाला. 'टाइम्स ऑफ इंडिया' वर्तमानपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
प्रितीला तात्काळ कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. राजस्थानला राहणारी प्रिती माहेरी आली होती. तिच्या पश्चात पती आणि चार महिन्यांचं बाळ आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement