आंदोलन का झालं, का नाही याचं उत्तर माझ्याकडं नाही, पण डोळे मिटून मी जेनझीवर विश्वास ठेवेन : मोहन भागवत
जेन झींचं आंदोलन का झालं, का नाही ? याची पूर्ण उत्तरं ना माझ्याकडे आहेत, ना तुमच्याकडे आहेत. पण मी जेनझीवर डोळे मिटून विश्वास ठेवेन असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
Mohan Bhagwat : जेन झींचं आंदोलन का झालं, का नाही ? याची पूर्ण उत्तरं ना माझ्याकडे आहेत, ना तुमच्याकडे आहेत. मीदेखील काही वाचूनच मतं बनवतो आहे. खरं काय, खोटं काय, मला माहिती नाही असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले. मला डोळे मिटून विश्वास ठेवायचं म्हंटलं, तर मी जेनझीवर डोळे मिटून विश्वास ठेवेन असेही मोहन भागवत म्हणाले. मुंबईत मोहन भागवत यांनी आज जे झीशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आयआयएमयुएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी त्यांची मुलाखत घेतली.
ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात
आंदोलन डायलॉगचा प्रकार आहे. ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात. आत्ता जे झालं ते ग्रेव्हिएन्सेस आहे. शिक्षण व्यवस्थेत अनेक गोष्टी व्यवस्थित नाहीत, बदल करायला हवा असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. आमच्या पिढीत मोठ्यांचे ऐकत होतो. आताचे जेनझी आणि अल्फा प्रश्न विचारतात आणि त्यांना प्रेम पाहिजे. वेगवेगळे ओपिनियन यातून येत असतात
आंदोलन वगैरे जेनझी यांनी करायचे नाही असं मी म्हणणार नाही. मात्र ते कसं करायचं हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितलं आहे. आंदोलन सिस्टिम करेक्शनसाठी होणं गरजेचं असेही ते म्हणाले. जे कधी व्हायला पाहिजे ते होत नाही तेव्हाच आंदोलनं होतात. जेनझी आपलीच पिढी आहे, आपलेपणा हवा. जेनझी जेन अल्फा आमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक आहेत असेही ते म्हणाले.
शिक्षणासाठी 6 टक्के आर्थिक तरतूद असावी
शिक्षण कमर्शिअल बिझनेस नाही, जगण्याची गरज आहे. सगळ्याच दृष्टीने याचा आता विचार व्हायला हवा असे भागवत म्हणाले. मी आपल्या जागी काय करु शकतो याचा विचार व्हायला हवा. शिक्षणाचा भार आपल्या सर्वांनी देखील उभारला पाहिजे. पुढची पिढी आपण बनवण्यासाठी शिक्षण देत असतो, फक्त पैसे कमावण्यासाठी नाही. शिक्षणासाठी 6 टक्के आर्थिक तरतूद असावी ही मागणी रास्त असल्याचे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. अंमलबजावणी व्हावी ही आग्रही मागणी नेहमीच असते. सरकारने सगळी व्यवस्था चालवली पाहिजे असं तर नाही आहे, मग आपण पण त्याचा भार उचलू शकतो असेही भागवत म्हणाले. एलजीबीटी समाजाचाच भाग आहे. समलिंगी विवाहाबाबत कायदा करण्याची गरज असल्याचे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तुम्ही यंत्रणा मिक्स करून नाही चालणार
ती सुधारावी लागेल असेही ते म्हणाले.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा























