एक्स्प्लोर

मुंबई, पुण्यापाठोपाठ उल्हासनगर हादरलं; उल्हासनगरमध्ये हातोड्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हातोड्याचा धाक दाखवून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Kalyan News : मुंबई, अमरावती, वसई आणि पिंपरीमधील बलात्काराच्या घटनांनी अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनांना अवघ्या काही तासांचाच अवधी लोटला असतानाच आता उल्हासनगरमध्येही अमानुष घटना घडली आहे. उल्हासनगर स्थानकानजिक एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. हातोड्याचा धाक दाखवत आरोपीनं तरुणीवर बलात्कार केला. 

कल्याणमध्ये एका 14 वर्षीय मुलीला हातोड्याचा धाक दाखवत बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही मुलगी शिर्डीला आईला भेटून परतत होती. या 14  वर्षीय अल्पवयीन तरुणीला उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर हातोड्याचा धाक दाखवत तिला निर्जनस्थळी नेण्यात आलं. त्यानंतर तिथं मुलीवर बलात्कार करण्यात आला. काल (शुक्रवारी) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रेल्वे  परिसरात घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. 

पीडित अल्पवयीन तरुणी उल्हासनगर परिसरात आपल्या आजीसोबत राहते. ती आपल्या आईला भेटण्यासाठी शिर्डीला गेली होती. शिर्डीवरून काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ती बसनं कल्याणपर्यंत आली. कल्याणमधून ती लोकलनं उल्हासनगर स्थानकात पोहोचली. उल्हासनगर स्थानकात उतरल्यानंतर स्कायवॉकवर तिला काही मित्र भेटल्यानं ती त्यांच्यासोबत बोलत उभी होती. याच दरम्यान श्रीकांत गायकवाड हा माथेफिरू तरुण तिथे आला त्यानं हातातील हातोडीनं तिच्या मित्रांना धाक दाखवत पळवून लावलं. त्यानंतर या तरुणीलाही हातोड्याचा धाक दाखवत जबरदस्तीनं स्थानकाच्या बाजूला असलेल्या पडक्या वसाहतीच्या जवळ नेलं. पीडित अल्पवयीन तरुणीनं विरोध केला मात्र आरोपीनं तिला मारहाण करत तिच्यावर अमानुष बलात्कार केला. यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दुपारी बलात्कार करणाऱ्या नराधामला अटक केली आहे. तसेच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती... 32 वर्षीय महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार, अत्याचारानंतर अमानुषपणे मारहाण

मुंबईतही दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती पहायला मिळाली होती. मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेवर आधी टेम्पोसमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महिलेसोबत अश्लील संभाषण करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला चोप, कल्याणमधील प्रकार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget