माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही : रामदास आठवले
अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरताना रामदास आठवले यांना एका तरुणानं धक्काबुक्की केली होती. धक्काबुक्कीच्या निषेध म्हणून रिपाइं कार्यकर्त्यांनी वांद्रे, मुलुंड, दहिसर, अंबरनाथमध्ये बंद आणि रास्तारोको केला.
![माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही : रामदास आठवले Ramdas Athvale reaction after attack in Ambarnath माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही : रामदास आठवले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/09172912/Ramdas-Athvale.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही, असा आरोप रामदास आठवलेंनी अंबरनाथमधल्या धक्काबुक्कीवर केला आहे.
माझ्यावर झालेल्या धक्काबुक्की मागे कोणतंही षडयंत्र असल्याचं मला वाटत नाही. कारण विविध पक्षातील नेते माझे चांगले मित्र आहे. मात्र माझ्यावर करणाऱ्या प्रवीण गोसावीमागे कुणाचे हात आहेत. त्याने माझ्यावर हल्ला नेमका का केला? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही आठवलेंनी केली.
आठवलेंवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहनही आठवले यांना केलं आहे. आज धक्काबुक्कीच्या निषेध म्हणून रिपाइं कार्यकर्त्यांनी वांद्रे, मुलुंड, दहिसर, अंबरनाथमध्ये बंद आणि रास्तारोको केला.
काय आहे प्रकरण?
केंद्रीय मंत्री रामदास आठवले अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना त्यांना प्रवीण गोसावी या तरुणानं धक्काबुक्की केली होती. आठवलेंच्या समर्थकांकडून धक्काबुक्की करणाऱ्याला प्रवीणला बेदम चोप दिला. आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गोसावीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)