एक्स्प्लोर

प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या; बाथटबमध्ये आढळला मृतदेह

प्रसिद्ध चित्रकार राम इंद्रनील कामत यांचा मृत्यू झाला असून ते 41 वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली असून त्यांचा मृतदेह बाथ टबमध्ये आढळून आला आहे.

मुंबई : बुधवारी संध्याकाळी माटुंगा येथे राहणारे 41 वर्षीय प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली, त्यांचा मृतदेह बाथ टबमध्ये सापडला असून त्यांनी सुसाईड नोट लिहून आपल्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.

राम कामत बुधवारी संध्याकाळी आंघोळ करण्यासाठी गेले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी ते बाथरूममधून बाहेर आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या आईने दरवाजा ठोठावला. मात्र दरवाजा आतून बंद केला नव्हता. दार उघडून त्यांची आई जेव्हा आत गेली, तेव्हा राम कामत बेशुद्धा अवस्थेत बाथ टबमध्ये पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

राम कामत हे एक चित्रकार होते. मुंबईतील माटुंगा येथे ते आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत होते. त्यांचा लग्न झालं नव्हतं. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राम कामत हे डिप्रेशनमध्ये होते आणि त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र ते डिप्रेशनमध्ये का होते याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांनी एडीआर दाखल करून याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

राम कामत यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट येणे अजून बाकी आहे, तसेच त्यांचा व्हिसेरा टेस्टिंगसाठी पाठवण्यात आला आहे. ज्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. राम यांचा मृत्यू बाथरूम टबमध्ये बुडून झाला की, त्यांनी कुठचा विषारी द्रव्यपदार्थ घेतला होता? हे त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र पोलीस सुसाईड नोट मिळाल्यामुशे आत्महत्या समजून तपास करत आहेत.

या सुसाईड नोटमध्ये राम कामत यांनी लिहिले आहे की, 'माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये तसेच त्यांनी जे चित्रं काढली आहेत ती त्यांच्या मित्रांना देण्यात यावीत, त्यांची आठवण म्हणून'

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. राम कामत यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. राम कामत यांचे मित्र कोण आणि मित्रांपैकी कोणाचा फोन आला होता का? याची चौकशी पोलीस करणार असून त्यांच्या मित्रांची माहिती पोलीस गोळा करत आहेत. राम कामत यांच्या आर्थिक व्यवहारांबाबतही पोलीस माहिती घेणार आहेत. तसेच राम कामत गेल्या दोन-तीन वर्षांपासून डिप्रेशनमध्ये का होते? याचं कारण जाणून घेणं हा पोलिसांच्या तपासामध्ये महत्त्वाचा मुद्दा असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्ट उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. तर विसरा रिपोर्टला काही वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे रिपोर्ट आल्यानंतरच राम कामत यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे ते स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget