एक्स्प्लोर

राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडणार, उद्या अधिकृत घोषणा : सूत्र

2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यभर दौरे करुन ते संघटना बांधणीचं काम हाती घेणार आहेत. शिवाय, विरोधी पक्षाची पोकळी भरुन काढण्याचं काम हाती घेणार असून, सरकारला धारेवर धरणार असल्याचीही माहिती मिळते आहे.

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी अखेर सत्तेला राम राम ठोकणार आहेत. उद्या (30 ऑगस्ट) पुण्यात शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. स्वभिमानी शेतकरी संघटनेचं सत्तेतील स्थान काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींनी पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेट्टींच्या पत्राला अद्याप उत्तर दिले नाही. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सरकारसोबत मतभेद वाढले होते. त्यातच राजू शेट्टींनी पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता. एकंदरीतच खासदार राजू शेट्टी सत्तेत सहभागी असूनही कमालीचे नाराज होते. 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यभर दौरे करुन ते संघटना बांधणीचं काम हाती घेणार आहेत. शिवाय, विरोधी पक्षाची पोकळी भरुन काढण्याचं काम हाती घेणार असून, सरकारला धारेवर धरणार असल्याचीही माहिती मिळते आहे. एकीकडे देशभरातील पक्ष भाजपप्रणित एनडीएममध्ये सहभागी होत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची संघटना असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र एनडीएपासून दूर जाण्याचा निर्णय घेते आहेत. दरम्यान, पुण्यातील उद्याच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर खासदार राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडण्यासोबतच आणखी काय भूमिका मांडतात आणि पुढील वाटचालीबाबत काय सांगतात, याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Embed widget