एक्स्प्लोर
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर पिंजऱ्यात, राज ठाकरेंचं व्यंगचित्र
राज ठाकरे यांनी त्यांच्या नव्या व्यंगचित्रात महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना आणि मुंबई महापालिकेला लक्ष्य केले आहे.

मुंबई : दररोजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या व्यंगचित्रातून टिका करताना पहायला मिळत आहेत. आता राज यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना आणि मुंबई महापालिकेला लक्ष्य केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निवासस्थान भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीच्या बागेत) हलवण्यात आले. त्यामुळे राज यांनी त्यांच्या व्यंगचित्रात महापौर महाडेश्वरांना राणीच्या बागेतील प्राण्यांच्या दाखवले आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवले. महापौरांनीदेखील अधिकृतरीत्या महापौर बंगल्याचा ताबा सोडला आहे. ते आता राणीच्या बागेतील सरकारी बंगल्यात राहत आहेत. या घटनेवरुन राज यांनी नवे व्यंगचित्र रेखाटले आहे. त्यामध्ये त्यानी महापौरांनाच लक्ष्य करत त्यांना प्राण्यांच्या पिंजऱ्यात नेऊन बसवलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये महापौरांसोबत पिंजऱ्यात प्राणीदेखील दिसत आहेत.#MayorinZoo #BMC #Shivsena pic.twitter.com/KELaurcLaW
— Raj Thackeray (@RajThackeray) November 9, 2018
#MayorinZoo #BMC #Shivsena pic.twitter.com/RGbf9NJUcf
— Raj Thackeray (@RajThackeray) November 9, 2018
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement


















