एक्स्प्लोर
Sangram Jagtap : अजितदादांनी कान टोचले? संग्राम जगतापांना बीडचा मोर्चा सोडून मुंबईत येण्याची सूचना
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'दिवाळीची खरेदी फक्त हिंदू दुकानदारांकडूनच करा' या त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांनी हे वक्तव्य पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरुद्ध असल्याचे सांगत जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे स्पष्ट केले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, अजित पवारांनी समज दिल्यानंतर संग्राम जगताप यांनी बीड येथील हिंदुत्ववादी मोर्चाला जाण्याचा निर्णय रद्द करून मुंबईत पक्षाच्या बैठकीसाठी हजर झाल्याची माहिती आहे. त्यामुळे जगताप यांच्या भूमिकेकडे आणि पक्षाच्या संभाव्य कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















