एक्स्प्लोर

MVA Election Commission: मविआच्या निवेदनावर राज ठाकरेंची छाप, पत्राच्या सुरुवातीलाच इम्पॅक्ट, निवडणूक आयोगाला भंबेरी उडवणारे प्रश्न

Maharashtra Election Commission: राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (Maharashtra Election Commission) एस. चोकलिंगम यांची भेट घेतली.

MVA Election Commission: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानात आणि अलीकडच्या काळातील मतदार यादीतील घोळाविषयी जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ मंगळवारी निवडणूक आयोगाचे सीईओ श्री. एस. चोकलिंगम यांच्या भेटीला गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुख्य निवडणूक आयुक्तांना मविआकडून (MVA) एक निवेदन सोपवण्यात आले. या निवेदनात महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.  राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची (Election Commission) भेट घेण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी यांचा समावेश होता. 

मविआच्या सर्वपक्षीय शिष्टमंडाळाने सादर केलेल्या या निवेदनावर राज ठाकरे यांची छाप दिसून आली. या निवेदनाची सुरुवात 'सस्नेह जय महाराष्ट्र', अशी करण्यात आली आहे. राज ठाकरे हे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्र आले आहेत. राज ठाकरे हे मविआच्या नेत्यांसोबत एकत्र येणे महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे मविआसोबत एकत्र निवडणूक लढवण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

MVA News: महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नेमकं काय म्हटलं?

प्रति,

मा. श्री. एस. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

विषय :- निवडणूक आयोगाच्या कारभारात अधिक पारदर्शिता आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासंबंधी.

सस्नेह जय महाराष्ट्र,

येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. परंतु 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षांपासून ते सामान्य माणसाच्या मनात खूपच शंका आहेत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असे आम्ही सगळेच मानतो, पण सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर, खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का, अशी शंका उत्पन्न होत आहे. असो. निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं. आम्ही मानतो आणि त्यामुळेच एकूण राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्यावर काही ठोस कृतीदेखील अपेक्षित

आहे.

१) २०२४ मध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि नावं वगळलीदेखील गेली... पण जी नावं वगळली त्याची यादी किंवा त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? त्यामुळे निवडणूक आयोगाने जी नावं वगळली आहेत, त्याचा पूर्ण तपशील आणि ती नावे ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीच पाहिजेत. कारण तो प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे.

२) महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ ला झाल्या आणि त्यादरम्यानची मतदार यादी ३० ऑक्टोबर २०२४ ला प्रसिद्ध झाली. मात्र त्यानंतर ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ च्या दरम्यान यादीत जी नावं समाविष्ट झाली, ती नावं व नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही? मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे, पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सामान्य माणसालासुद्धा मतदार यादी का बघायला मिळत नाही आहे. ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की, कोणाचा तरी दबाव आहे? असं काही असल्यास निवडणूक आयोगाने तसं स्पष्ट सांगावं आणि जर यादी प्रसिद्ध करायचीच नसेल तर निवडणुकीचा फार्स कशाला करायचा?

३) निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ च्या मतदार यादीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असं घोषित केलं. म्हणजे जुलै २०२५ नंतर ज्यांचं वय १८ पूर्ण होईल त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे ५ वर्षे थांबायचं? निवडणुकीची घोषणा होईपर्यंत जो जो मतदार १८ वर्षांचा होईल त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा.

४) महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे. यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यातदेखील मतदार असतात आणि इथे पुन्हा महाराष्ट्रात पण मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेतात. मुळात दोन दोन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणे, मतदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण मुळात दुबार नोंदणी होऊ नये, ही जबाबदारी निश्चितच आहे निवडणूक आयोगाची आहे. पण अशी दुबार नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोग नक्की काय प्रयत्न करत आहे? जर बिहारमध्ये दुबार नाव नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबवली तर मग महाराष्ट्रात तसा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी का दिसत नाही आहे? दुबार नोंदणी काढण्यासाठी 'डी-डुप्लिकेशन' पद्धतीचा वापर करावा.

५) महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही असं निवडणूक आयोगाने सांगितलं, असं का? निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की, व्हीव्हीपॅटसोबत जोडण्याकरिता आवश्यक असलेल्या ईव्हीएम त्यांच्याकडे पुरेशा नाहीत? मुळात २०२२ मध्ये होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता २०२६ मध्ये होणार आहेत. मग चार वर्षात निवडणूक आयोग तयारी तरी कसली करत होते? आजपर्यंत हजारो करोड रुपये खर्च करून जी व्हीव्हीपॅट मागवली गेली ती नक्की कुठे आहे? सामान्य जनतेचा ईव्हीएमवरच विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी खातरजमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'व्हीव्हीपॅट. तोच मार्ग तुम्ही बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा?

६) वरं, प्रभाग पद्धतीने जिथे निवडणुका होणार आहेत, तिथे व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे, अरे मग प्रभाग पद्धतच रद्द करा की! खर तर प्रभाग पद्धत मुळात आणलीच कशासाठी? त्यांचा मतदारांना काय उपयोग? मतदारांनी तरी चार चार वेळा मतदान का करायचं? निवडणुकांनंतर कामासाठी त्यांनी कोणत्या नगरसेवकाकडे जायचं? तेच नगरसेवक आपापसात क्रेडिटसाठी आणि (इतर) गोष्टींसाठी भांडत बसतात. मग प्रभागातील कोण बघणार? ही अशी निवडणूक पद्धत तर संपूर्ण भारतात कुठेच नाहीये मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे? सत्ताधायींच्या सोयीसाठी का? असो.

पण मुंबईत जिथे प्रभाग पद्धतच नाही, तिथे पण निवडणूक आयोग VVPAT सुविधा असलेली ईव्हीएम मशिन्स देऊ शकत नसेल तर आमची अशी मागणी आहे की, मग मुंबई महापालिकेच्या निवडणुका या बैलेट पेपरवरच घ्या.

निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभाराबद्दल संपूर्ण देशपातळीवर शंका आहेत. निवडणूक आयोगानेच जर स्वायत्ता दाखवली नाही तर कोण दाखवणार? त्यामुळे निवडणूक आयोगाने आता तरी कोणाच्या तरी दबावाच्या बाहेर येऊन भेदभाव न करता आम्ही उपस्थित केलेल्या मागण्या आणि त्यावरचे उपाय यावर कार्यवाही करावी. या मागण्या किंवा उपाय या फक्त राजकीय पक्षांच्यांच आहेत असं नाही, तर एकूणच सामान्य माणसांच्या मनातील प्रश्नांचं प्रतिबिंब आहे आणि याचं संपूर्ण भान महाराष्ट्र निवडणूक आयोग ठेवेल, अशी आशा व्यक्त करतो.

तुमच्याकडून या सर्व प्रश्नांची निश्चित अशा कार्यवाहीची अपेक्षा आहे.

कळावे,

आपले नम्र,

 

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'शेतकरी भोळा आहे, पण मूर्ख नाही', Uddhav Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंची मागणी
Marathwada Tour 'अदानीच्या सिमेंटला हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो का?', Uddhav Thackeray यांचा सवाल
Pune Land Scam: 'तोंडात किडे पडतील', सरकारची फसवणूक करताय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात
Vijay Wadettiwar on Parth Pawar : पुणे जमीन घोटाळ्याचे आरोप, वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Parth Pawar: पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
NCP Pune Politics: पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
Brazilian Model Video Rahul Gandhi:  Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Embed widget