एक्स्प्लोर
फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? : राज ठाकरे
दिवाळीचा सण जसा साजरा करतात, तसा लोकांनी साजरा करावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
![फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? : राज ठाकरे Raj Thackeray On Banning Crackers During Diwali Latest Update फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? : राज ठाकरे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/05082554/raj-thackeray-7-768x576.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : फटाकेबंदीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. हिंदू सणांवरच बंदी का, असा सवाल उपस्थित करत फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
दिवाळीचा सण जसा साजरा करतात, तसा लोकांनी साजरा करावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. मात्र वयोवृद्ध नागरिकांना जिथे त्रास होतो, तिथे फटाके वाजवताना काळजी घेतली जावी. परंतु वर्षानुवर्षे साजऱ्या होणाऱ्या सणांवर बंधनं यायला लागली, तर सर्वच सण कायमस्वरुपी बंद करा आणि सर्व सणांच्या सुट्ट्याही रद्द करा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली.
फटाकेबंदीला आमचा विरोध आहेच, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. हिंदू सण साजरे करण्यावरच बंदी का येते, असा प्रश्न उपस्थित करत 'आता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का?' अशी तिरकस प्रतिक्रिया राज यांनी दिली.
खरंतर कोर्टाने अतिरेक्यांना सांगितले पाहिजे की इथे बॉम्ब फोडू नका, असं उपहासात्मक विधानही राज ठाकरेंनी केलं.
फटाकेबंदीचा निर्णय का?
दुसरीकडे, फटाकेबंदीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेतही दुफळी माजली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन फटाकेविक्रीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर आक्षेप घेतला. फटाक्यांवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे आणि फक्त भारतातच नाही तर जगात फटाके आहेत. त्यामुळे फटाकेविक्री बंद करु नका, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.फटाकेबंदीवरुन शिवसेनेतच जुंपली, संजय राऊतांचा फटाकेबंदीला विरोध
अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची राज्यभरात जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात आली आहे. मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शपथही देण्यात आली. संबंधित बातम्या : महाराष्ट्रातही यंदा फटाक्यांविना दिवाळी साजरी होणार? राजधानी दिल्लीतल्या फटाकेबंदीचे पडसाद महाराष्ट्रातही?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)