एक्स्प्लोर

Railway Recruitment Case: रेल्वे चतुर्थ श्रेणी नोकरभरती प्रकरणी हायकोर्टाची तीव्र नाराजी

1065 पदं रिक्त असताना केवळ 380 उमेदवारांची भरती का? हायकोर्टाचा सवाल. दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे रेल्वे प्रशासनाला निर्देश

मुंबई : रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी नोकरभरती घोटाळा प्रकरणी वारंवार प्रतिज्ञापत्रसादर करून निव्वळ कागदी घोडे नाचवणार्‍या रेल्वे प्रशासनाची मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी चांगलीच कानउघडणी केली. गुणवत्ता यादी तयार न करता या उमेदवारांना वगळण्यात आल्याचं लक्षात येताच मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं तीव्र संताप व्यक्त करत प्रश्‍नांचा भडीमार केला. उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्याचे आदेश दिलेले असतानाही यादी तयार न करताच काही उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं, तर निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्या निकषावर नियुक्त करण्यात आलं?, रेल्वे विभागात पदं रिक्त असतानाही या उमेदवारांना नियुक्त का केलं नाही?, असे प्रश्‍न उपस्थित करून हायकोर्टानं यासंदर्भात दोन आठवड्यांत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला देत याचिकेची सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.

रेल्वे प्रशासनाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर बोट ठेवत मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी त्यांना फैसावर घेतलं. साल 2007 च्या उमेदवारांना ताटकळत का ठेवण्यात आलं?, त्यानंतर साल 2015 ला मॅटने गुणवत्ता यादी तयार करण्याचे आदेश दिले असताना आजपर्यंत गुणवत्ता यादी तयार का करण्यात आली नाही?, गुणवता यादी शिवाय अन्य उमेदवारांना कोणत्या निकषावर नियुक्त करण्यात आलं?, उमेदवारानं अर्ज भरल्यानंतर त्यांनी सादर केलेली कागदपत्रं ,लेखी परिक्षा ,वैद्यकिय परिक्षा आणि त्यानंतर नियुक्तीपत्र देताना वर्गवारी कशी केली?, गुणांचा कटऑफ कसा ठरवला?, या संदर्भात दोन आठवड्यांत रेल्वेला भूमिका स्पष्ट करायची आहे.

सोनू तुला वीजबिल भरायचं नाय का? थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणचा अनोखा फंडा 

काय आहे याचिका -

मध्य रेल्वेच्या  मुंबई , पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या पाच विभांगासाठी चतुर्थ श्रेणीच्या सुमारे 6413 पदांच्या नोकर भरतीसाठी साल 2007 मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर साल 2011 मध्ये त्याची निवड प्रक्रिया सुरू झाली. या निवड प्रक्रियेनंतर उर्त्तीण झालेल्या उमेदवारांची वैद्याकिय तपासणीही घेण्यात आली. मात्र त्यांची नियुक्ती केली गेली नाही. रेल्वे प्रशासनानं गुणवत्ता यादी तयार न करता भरती प्रकिया पूर्ण केली. यावर आक्षेप घेत योगेश पाटील, ज्ञानेश्‍वर शिंदे यांच्या सह सुमारे 300 उमेदवारांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget