(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Narwekar : शरद पवारांच्या मनाविरोधात जाणे म्हणजे पक्ष सोडणे नव्हे : राहुल नार्वेकर
Mumbai : शरद पवारांच्या (Sharad Pawar) मनाविरोधात जाणे म्हणजे पक्ष सोडणे नव्हे. या पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. एनसीपी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यात १६ कायमस्वरूपी सदस्य आहेत. मात्र,पक्षाची घटना कायमस्वरुपी सदस्यांना परवानगी देत नाही.
Mumbai : शरद पवारांच्या (Sharad Pawar) मनाविरोधात जाणे म्हणजे पक्ष सोडणे नव्हे. या पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. एनसीपी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यात १६ कायमस्वरूपी सदस्य आहेत. मात्र,पक्षाची घटना कायमस्वरुपी सदस्यांना परवानगी देत नाही. यामध्ये पक्षीय घटना व नेतृत्व रचनेत सुस्पष्टता नाही. नेतृत्व रचना,पक्षीय घटना व विधीमंडळ बळ पाहून पक्ष कुणाचा हे ठरवावे लागेल. त्यामुळे अजित पवार यांचा गटच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला आहे.
दोन्ही गटांचे आमदार पात्र
दोन्ही गटाचे सर्व आमदार विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवताना नार्वेकर म्हणाले, पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र तो गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे.शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
मी माझे मत मांडण्यास सुरुवात करत आहे. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र तो गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे. शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
सर्व याचिका डिसमिस करण्यात आल्या आहेत
विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता ४१ आमदारांचे पाठबळ अजित पवार गटाकडे दिसते. त्यामुळे अजित पवार यांना विधीमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो. त्यामुळे सर्व याचिका डिसमिस करण्यात आल्या आहेत. नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणाही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या