एक्स्प्लोर

मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत, राहुल गांधींचं भाजपला आव्हान

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार असल्याचंही ते म्हणाले. मुंबईतील गोरेगावमध्ये बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत कसे तरी वाचले, कर्नाटकात हरले, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसणारही नाहीत, असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार असल्याचंही ते म्हणाले. मुंबईतील गोरेगावमध्ये बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. भिवंडी कोर्टातील सुनावणीसाठी राहुल गांधी आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली. ''मोदी अडवाणींना विसरले'' मोदी ज्या लालकृष्ण अडवाणींना गुरु मानायचे, त्यांनाच ते आज आदर देत नाहीत, याबद्दल आपल्याला वाईट वाटतं, असं राहुल गांधी म्हणाले. 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत आम्ही अडवाणींना हरवलं. संसदेतील कार्यक्रमात मी अडवाणींच्या सन्मानाचं रक्षण करतो, त्यांना पुढे उभे करतो, असं राहुल गांधी म्हणाले. आपल्या धर्मात गुरु सगळ्यात मोठा असतो. आपण त्यांना मान देतो. नरेंद्र मोदी यांचे गुरु एल. के. अडवाणी आहेत, पण त्यांचा जाहीर कार्यक्रमांमध्ये सन्मान राखण्याचं काम काँग्रेस पक्ष करतो, कारण आमचा तो धर्म आहे, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. आम्ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींविरोधात लढलो. पण काल रुग्णालयात भेटायला पहिला मी गेलो, कारण हा काँग्रेसचा धर्म आहे, इतिहास आहे, असंही राहुल गांधींनी सांगितलं. सावरकर जेव्हा माफी मागत होते, हात जोडून सांगत होते माफ करा, तेव्हा काँग्रेसचे नेते तुरुंगात खितपत पडले होते, 15 ते 20 वर्षांची शिक्षा भोगत होते. आमच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिले, असं राहुल गांधी म्हणाले. भिवंडी कोर्टात नेमकं काय झालं? दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मात्र राहुल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा कोर्टात केला. महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहर कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली आणि राहुल गांधींवर आरोप निश्चित झाले. या प्रकरणावर येत्या 10 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे. यावेळी राहुल यांच्यासोबत काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget