एक्स्प्लोर

मुंबईवर दु:खाचा डोंगर, राहुल गांधींकडून मराठीतून फुंकर

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत.

मुंबई : लोअर परेलमधील कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग लागली. यात मोठी जीवितहानी झाली. या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चौकशीचीही मागणी केली. त्यांनी मराठीतून ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी काय म्हणाले? “मुंबईमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पीडितांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.”, अशा भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्या. कमला मिल्स कंपाऊंडमध्ये आग मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. काय आहे प्रकरण? हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पाहा बातमीचा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Thackeray Brothers Protest : राज ठाकरेंनी 'शिवतीर्थ'वर तिरंगा मोर्चाचा प्लॅन आखला, मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, शरद पवारांनाही फोन फिरवला
राज ठाकरेंनी 'शिवतीर्थ'वर तिरंगा मोर्चाचा प्लॅन आखला, मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, शरद पवारांनाही फोन फिरवला
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha : प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून मनसेकडून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Embed widget