एक्स्प्लोर

अग्नितांडवाच्या वाढत्या घटना, मुंबईतल्या विविध आस्थापनांच्या फायर ऑडिटवर पुन्हा प्रश्नचिन्ह

अग्नितांडवाचं शहर बनलेल्या मुंबईत फायर ऑडिटला प्रशासन आणि मुंबईकरसुद्धा फार गांभीर्यानं घेत असल्याचं दिसत नाही.

मुंबई : अग्नितांडवाच्या वाढत्या घटनांनी मुंबईतल्या विविध आस्थापनांच्या फायर ऑडिटवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. कमला मिल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने शासकीय आणि निमशासकीय इमारतींना फायर ऑडिट करणं बंधनकारक केले होतं. पण, अग्नितांडवाचं शहर बनलेल्या मुंबईत फायर ऑडिटला प्रशासन आणि मुंबईकरसुद्धा फार गांभीर्यानं घेत असल्याचं दिसत नाही. मुंबईत मरण अगदी सोपं झालं आहे हे काही वेगळं सांगायला नको. आग लागण्याच्या घटना तर मुंबईत सवयीच्या झाल्या आहेत. कमला मिलमधील वन अबाव्ह आणि मोजो ब्रिस्टो या रेस्टोपबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने अग्नी सुरक्षेवर उपाय योजना सुचवल्या होत्या पण त्या आता पर्यंत कागदावरच राहिल्या आहेत. कमला मिल, कुर्ला भानुशाली आग दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईत 34 अतिरिक्त फायर ऑफिसर नेमले होते. मुंबईतील फायर ऑडिट तपासणी करणं हे त्याच काम होतं, पण असं होताना दिसत नाही. मुंबईत शासकीय निमशासकीय इमारतींचं फायर ऑडिट करुन घेणं बंधनकारक केलं होतं. 2019 मध्ये 1402 आग लागण्याच्या घटना झाल्या आहेत, ज्यात 91 जण जखमी झाले असून 10 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत सरकारच्या अखत्यारितील इमारतींचंच फायर ऑडिट रखडलं आहे. त्यामुळे, मुंबईतल्या इतर इमारतींच्या अवस्थेची कल्पना न केलेली बरी. नियमानुसार इमारतीतील अग्निशमन यंत्रणा दर सहा महिन्यांनी ऑडिट करून संबंधित विभागाकडे जमा करणे आवश्यक आहे. मात्र अनेक सोसायट्या याकडे अनेक वर्ष लक्ष देत नाहीत. राज्यभरात अशा 588 परवानाधारक एजन्सी आहेत. या एजन्सीपैकी 240 मुंबईभरात आहेत. मुंबईत अनेक इमारती ऑडिट करत नाहीत. मुंबईतील शासकीय निमशासकीय इमारतीचे फायर ऑडिट करून घेणं गरजेचं आहे. सर्व इमारती नागरिकांनी सुद्धा आपल्या इमारतीच फायर ऑडिट करुन रिपोर्ट अग्निशमन दलाकडे सोपवणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी पालिका फायर ऑडिट करेल अस नाही त्या-त्या आस्थापनाची जबाबदारी आहे गेल्या काही वर्षातील आगीच्या मोठ्या दुर्घटना
  • कुर्ला पश्चिम येथील सीएसटी रस्त्यावरील कपाडिया नगरच्या रद्दी सामानाने लागलेल्या 20 -25 गोदामाना गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली.
  • सीएसटी-मशिद स्थानकाजवळील झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीमुळे काही वेळ रेल्वे गाड्याही थांबवण्यात आल्या. या आगीत सहा ते सात मुले जखमी झाली.
  • गिरगावातल्या काकडवाडीत आग लागली. येथे तळमजल्य़ातील लॉंड्रीतल्या कपड्यांनी पेट घेतला (सकाळी) ही आग पहिल्या मजल्यापर्यंत गेली व त्यात एका कुटुंबातील दोघं जखमी झाली तर एकाचा मृत्यू झाला.
  • नायर रुग्णालयातील ईएनटी विभागाच्या इमारतीला शॉर्टसर्किटमुळे भर दुपारी मोठी आग लागली. ती विझवायला तीन तासाहून अधिक वेळ लागला. या आगीत विद्युत यंत्रणांचे नुकसान झाले.
  • चेंबुरच्या आर के स्टुडिओत दोन सेट जळून खाक झाले. येथे आग विझवणारी अग्निशमन यंत्रणा काम करीत नव्हती. यावेळी चित्रीकरण नसल्याने मोठी दुर्घटना टऴली.
  • विलेपार्ले येथील सागर ज्योती इमारतीत आग लागली. या आगीत काहीजण जखमी झाले.
  • जवाहरव्दीप व बुचर बेटावरच्या बीपीसीएल टाकीवर वीज पडून मोठी आग लागली. 30 हजार मेट्रिक टनाच्या टाकीत हायस्पीड डिझेल ठेवलेले होत, ते जळलं.
  • वांद्रे पूर्व येथील गरीब नगर- बेहराम पाडा झोपडपट्टीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. यांत तीघे जखमी झाले आहेत.
  • दोन महिन्यांपूर्वी विलेपार्ले येथील सागर ज्योती या इमारतीत भीषण आग लागली. ही आग विझवताना एक जवान जखमी झाला.
  • साकीनाका खैरानी रोडवरील भानू फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत आज १२ कामगार होरपळून ठार झाले.
  • कमला मिल दुर्घटना 14 जणांचा मृत्यू
  • अंधेरी कामगार रुग्णालयात लागलेली आग , यात सहा ज्यांचा मृत्यू झाला होता
  • एमटीएनएल मधील भीषण आग , यात 84 जणांना सुखरूप वाचवण्यात यश
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
Embed widget