एक्स्प्लोर
आठवलेंवरील हल्ल्यानंतर वातावरण तापलं, कार्यकर्त्यांकडून अंबरनाथ बंद
आरपीआय (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ बंद पुकारला असून शहरात सर्व दुकाने बंद आहेत. शहरात आरपीआय कार्यकर्त्यांनी लावले निषेधाचे फलक लावले आहेत.
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अंबरनाथमध्ये वातावरण तापले आहे. आरपीआय (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ बंद पुकारला असून शहरात सर्व दुकाने बंद आहेत. शहरात आरपीआय कार्यकर्त्यांनी लावले निषेधाचे फलक लावले आहेत. दरम्यान, आठवलेंवर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावी याला काल रात्री उशिरा मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी गंभीर आहे.
या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून आरपीआय कार्यकर्ते सकाळपासून चौकाचौकात जमत बंदचं आवाहन करत आहेत. असे असले तरी रिक्षा युनियनने बंदमध्ये सहभागी होण्यास विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
काल आठवलेंवर झालेला हल्ला हा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरपीआयचा आरोप असून जोपर्यंत स्थानिक एसीपी आणि डीसीपी यांना निलंबित केलं जात नाही, तोवर बंद सुरू राहील, असा इशारा आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष अजय जाधव यांनी दिला आहे.
ठाण्यातही कार्यकर्त्यांचा रास्तारोको
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील आनंदनगर जकात नाका येथे आठवले समर्थकांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. ठाणे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
आठवलेंवर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावी याची पार्श्वभूमी
- प्रवीण गोसावी हा मूळचा अमरावती जिल्ह्यातला असून सध्या अंबरनाथच्या लक्ष्मीनगर भागात राहतो
- सुरुवातीला रिक्षाचालक होता, मनसे वाहतूक सेनेचा पदाधिकारी होता, आता बांधकाम व्यावसायिक आहे
- अंबरनाथ शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख
- एकदा नगरपालिकेविरोधात उपोषण केलं , तर एकदा पालिकेच्या लिपिकाला एसीबीमार्फत पकडून दिलं आहे
- मनसेची भूमिका पटेनाशी झाल्यानं मनसेतून बाहेर पडला, त्यावेळीही राज ठाकरेंविरोधात फेसबुकवर लिखाण केलं
- यानंतर काही काळ आरपीआय आठवले गटात सक्रिय, मात्र त्यातूनही बाहेर पडला आणि आठवलेंविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्या आहेत
- सध्या भारिप बहुजन महासंघात सक्रिय असून रामदास आठवलेंचा तिरस्कार अनेकदा त्याच्या बोलण्यातून आणि पोस्टमधून दिसून आलाय
- रामदास आठवले यांना समाजाशी देणं घेणं नसून फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचा वापर करत असल्याचा गोसावी याचा आरोप आहे
- याच रागातून त्याने काल आठवले यांच्यावर हल्ला केल्याची शक्यता आहे
काय आहे प्रकरण?
केंद्रीय मंत्री रामदास आठवले अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना त्यांना एका तरुणानं धक्काबुक्की केली होती. आठवलेंच्या समर्थकांकडून धक्काबुक्की करणाऱ्याला बेदम चोप देण्यात आला. त्यानंतर आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गोसावी या आठवलेंना धक्काबुक्की करणाऱ्या तरूणाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement