#MaharashtraPoliticalCrisis : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "आमच्या हातात काहीच नाही, उद्धव ठाकरे यू टर्न घेतील वाटत नाही"
#MaharashtraPoliticalCrisis : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत एबीपी माझाशी बोलताना महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार, तर भाजपसोबत जाणार आहेत का? अशी विचारणा केली.
Maharashtra Political Crisis : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचे आवाहन केले आहे. आपण मुंबईत परतल्यानंतर आपल्या भूमिकेचा विचार केला जाईल, मी पोकळ बोलत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासमोर बसून मार्ग काढला जाईल, असे आवाहन करतानाच त्यांनी महाविकास आघाडीतून (Maharashtra Political Crisis) बाहेर पडायचं असल्यास समोर येऊन चर्चा करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आता संशयकल्लोळ सुरु झाला आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत एबीपी माझाशी बोलताना भूमिका स्षट केली. महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार, तर भाजपसोबत जाणार आहेत का? अशी विचारणा त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधल्यानंतर त्यांनी याबाबत काहीच बोलले नाही. त्यामुळे शिंदे गटाकडून समर्थन असलेल्या आमदारांचा फोटो समोर आल्यानंतर त्यांनी दबावाखाली भूमिका घेतली आहे हे स्पष्ट नसल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यू टर्न घेतील वाटत नाही
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यू टर्न घेतील, असे मला वाटत नाही. मात्र, त्यांना भूमिका घेण्याचा अधिकार आहे. आमच्या हातात काहीच नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कोणती भूमिका घ्यायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर चव्हाण यांनी मुख्यमंत्री यू टर्न घेतील याचे आश्चर्य आहे. स्वत: लाईव्ह येऊन सांगितल्यास योग्य होईल. शिवसेनेत काय चाल्लय आहे ते तो त्यांचा अंतर्गत मामला असल्याचेही चव्हाण म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या