एक्स्प्लोर
Advertisement
ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?
“मी खूप खूश आहे. मला माझ्या कुटुंबाला भेटायचं आहे. मला दोन कुटुंब आहेत. एक म्हणजे माझी मातृभूमी, माझी लष्करी सेवा आणि दुसरं म्हणजे माझं स्वत:चं कुटुंब" अशी प्रतिक्रिया लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दिली
मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आजच सुटण्याची शक्यता आहे.
कर्नल पुरोहित यांना कालच सुप्रीम कोर्टाने 9 वर्षांनी जामीन मंजूर केला. जामीनाची रक्कम 2 लाख रुपये रोख भरल्यानंतर, आज सत्र न्यायालय सुटकेचं पत्र देईल, त्यानंतर कर्नल पुरोहित बाहेर येतील.
पुरोहितांची ‘माझा’कडे प्रतिक्रिया
दरम्यान, प्रसाद पुरोहित यांनी एबीपी माझाकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “मी खूप खूश आहे. मला माझ्या कुटुंबाला भेटायचं आहे. मला दोन कुटुंब आहेत. एक म्हणजे माझी मातृभूमी, माझी लष्करी सेवा आणि दुसरं म्हणजे माझं स्वत:चं कुटुंब, माझी आई, बहीण, बायको, दोन मुलं आणि दोन कुत्री”
पुरोहित पुन्हा ड्युटीवर
दरम्यान, कर्नल पुरोहित पुन्हा आर्मीमध्ये रुजु होणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांना कोर्टाच्या आदेशाची पत्र लष्कराला पुरवावी लागणार आहे.
सप्टेंबर 2008 मधील मालेगाव स्फोटानंतर कर्नल पुरोहित यांना लष्करी सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं. मात्र दोष सिद्ध न झाल्यामुळे , त्यांना आजही 75 टक्के पगार आणि भत्ते मिळतात.
पुरोहित हे 1994 साली सैन्यामध्ये रुजू झाले. मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांना देशसेवेची संधी मिळाली. चेन्नईतल्या प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग थेट काश्मीरमध्ये करण्यात आली. पण आजारी पडल्याने त्यांना दहशतवादविरोधी पथकाच्या गुप्तचर खात्यात पाठवण्यात आलं.
मात्र 2008 च्या मालेगाव स्फोटाचे धागेदोरे कर्नल पुरोहितांकडे पोहोचल्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातल्या पंचमढीतल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. अरबी शिकण्यासाठी ते तिकडे गेले होते. पण ते त्यावेळी मुंबईतील कुलाबा आर्मी हेडक्वॉर्टरमध्ये कार्यरत होते.
त्यामुळे कर्नल पुरोहित हे इथूनच पुन्हा ड्युटी जॉईन करण्याची शक्यता आहे.
तांत्रिकदृष्ट्या कर्नल पुरोहित हे आजही लष्करी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे ते पुन्हा रुजु झाल्यानंतर त्यांची बदली होण्याची चिन्हं आहेत. मात्र त्यांना रुजु करुन घ्यायचं की निलंबितच ठेवायचं, कार्यालयीन कामं सोपवायची की नाही, तसंच त्यांना प्रत्यक्ष लष्करी गणवेश परिधान करु द्यायचा की नाही, असे अनेक प्रश्न अधिकाऱ्यांना आहेत. याबाबतचा निर्णय त्यांचा कमांडिंग ऑफिसर घेतील.
संबंधित बातम्या
2008 मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला अखेर जामीन
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement