एक्स्प्लोर

Mumbai Building Collapsed | 20 तासांनी भानुशाली इमारत दुर्घटनेचं बचावकार्य संपलं, 9 मृत्युमुखी

20 तासांच्या अथक परिश्रमांनंतर दक्षिण मुंबईच्या फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेचं बचावकार्य संपलं. या दुर्घटनेत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : 20 तासांच्या अथक परिश्रमांनंतर सीएसएमटी स्टेशनसोमरील भानुशाली इमारत दुर्घटनेचं बचावकार्य संपलं आहे. या दुर्घटनेत दुर्दैवाने एकूण नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सर्वांना बाहेर काढण्यात आल्याचं एनआरएफकडून जाहीर करण्यात आलं. यानंतर एनडीआरएफची टीम घटनास्थळावरुन रवाना झाली. सध्या मुंबई महापालिकेकडून ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे.

फोर्ट परिसरातील पाच मजली भानुशाली इमारत काल (16 जुलै) दुपारी साडेचारच्या सुमारास कोसळली. त्यानंतर घटनास्थळी तातडीने धाव घेत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रॉलिक शिडीच्या माध्यमातून अनेकांना बाहेर काढलं. मुंबई पोलिसांनी ढिगाऱ्याचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्याने दरवर्षी मान्सून दरम्यान घडणाऱ्या या घटना थांबवण्यासाठी आता प्रशासनाने काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.

  • भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सर्वांना बाहेर काढण्यात आल्याचं एनआरएफकडून जाहीर करण्यात आलं. यानंतर एनडीआरएफची टीम घटनास्थळावरुन रवाना झाली. सध्या मुंबई महापालिकेकडून ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे.
  • 20 तासांच्या बचावकार्यात आणखी एक मृतदेह बाहेर काढला, भानुशाली इमारतीच्या दुर्घटनेत एकूण नऊ जणांचा मृत्यू
  • भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आठवर, 20 तासांच्या बचावकार्यानंतर दोन मृतदेह बाहेर
  • ढिगाऱ्याखाली अजूनही दोन जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • इमारत दुर्घटनेच्या सोळा तासांनंतरही अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य अजूनही सुरुच आहे.

मुंबई : दक्षिण मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या भानुशाली इमारत दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. अजूनही दोन जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान 15 तास उलटून गेल्यानंतरही बचाव कार्य अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत यातून 24 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे.

मुंबईत सलग दोन ते तीन दिवस पाऊस सुरु आहे. त्यातच गुरुवारी (16 जुलै) दुपारी साडेचारच्या सुमारास भानुशाली इमारतीचा मोठा भाग कोसळला आहे. ही इमारत पाच मजली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

Building in Fort collapse | मुंबईत फोर्ट परिसरात भानुशाली इमारतीचा भाग कोसळला, दोघांचा मृत्यू

या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार अरविंद सांवत, मुंबई महापालिका आयुक्त यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडूनही त्यांनी माहिती घेतली होती. जखमींना उपचारांसाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत : पालकमंत्री आदित्य ठाकरे

कोसळलेली इमारत म्हाडाकडून खाली करण्यात आली होती. या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरु होतं. गुरुवारी सकाळीच इमारतीच्या मालकाने इमारत रिकामी करवून घेतली होती अशी माहिती मिळत आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "मुंबईत सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस सुरु आहे. अशात इमारत खचण्याचा किंवा कोसळण्याचा धोका वाढला आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात अनेक जुन्या इमारती आहेत. मुंबई महापालिकेने 2019 मध्ये या इमारतीला धोकादायक घोषित करुन नोटीस जारी केली होती. अनेक कुटुंब इमारत सोडून गेले होते. मात्र आठ कुटुंब इमारतीतच राहत होते."

मालवणीतही इमारत दुर्घटना, मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत मुंबई उपनगरातील मालाडमधल्या मालवणीतही गुरुवारी (16 जुलै) झालेल्या इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर इतर 13 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली.

Bhanushali Building Collapses | मुंबईतील भानुशाली इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरुच

Building in Fort collapse | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget