एक्स्प्लोर

संजय राठोड प्रकरणी शिवसेनेचे 'वेट ॲण्ड वॉच'! राठोडांच्या राजीनाम्यावरुन दोन गट

Sanjay Rathod case : संजय राठोड प्रकरणी शिवसेनेनं 'वेट ॲण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. पोलिसांचा रिपोर्ट येईपर्यत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच संजय राठोडांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडले असल्याची देखील माहिती आहे.

मुंबई : संजय राठोड प्रकरणी शिवसेनेनं 'वेट ॲण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. पोलिसांचा रिपोर्ट येईपर्यत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच संजय राठोडांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडले असल्याची देखील माहिती आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेत गहन चर्चा सुरु आहे. राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह आहे. राजीनामा देण म्हणजे आरोप मान्य करण्यासारखी गोष्ट असल्याचं राजीनाम्याला विरोध करणाऱ्या गटाचं मत आहे. संजय राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडू नये असं मत अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलंय. राजीनाम्याच्या प्रश्नावर अद्यापही कुणाकडेच ठोस माहिती नाही हे मात्र नक्की.

शिवसेनेत संजय राठोड यांच्यावरुन दोन गट शिवसेनेत संजय राठोड यांच्यावरुन घेऊन दोन गट पडल्याचे दिसते आहे. मात्र आधीपासूनच संजय राठोड हे एकनाथ शिंदे गटाचे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात सेनेच्या खासदार भावना गवळी आणि यवतमाळ जिल्ह्यातील बाजोरिया, देशमुख यांच्यासारखे नेते. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा का? संजय राठोड यांनी मीडियासमोर येऊ नये. संजय राठोड आणि परिवाराने नक्की कुठे राहावे? संजय राठोड यांच्याकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली त्यातील महत्वाचा दुआ, असे बरेच 'निर्णय', 'आदेश' किंवा 'सल्ले' देण्यात आले आहेत. त्यात परवा शिवसेनेची बैठक झाली. Pooja Chavan Suicide Case | विदर्भातील काही शिवसेना नेते राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही

पूजा चव्हाणच्या रिपोर्टचं काय झालं? पूजा चव्हाण प्रकरणाचा रिपोर्ट तयार करण्याचं काम सुरु आहे. पोलीस पूर्णपणे वेळ घेऊन रिपोर्ट तयार करत आहेत. रिपोर्टमध्ये कोणतीही कमी ठेवायची नाहीय, जेणेकरून पुणे पोलीसांवर संशय निर्माण होईल. या रिपोर्टमध्ये तिच्या कॉल्स रेकॉर्ड्स, फॉरेन्सिक रिपोर्ट, संबधित व्यक्तीचं कनेक्शन, बॅंक डिटेल्स आणि पासपोर्टची माहिती मिळणार आहे. रिपोर्ट पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यानंतर त्याचा अभ्यास करून तो मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल, अशी माहिती आहे.

Sanjay Raut | संजय राठोड यांच्याविषयी शिवसेनेत कुठलेही गट नाहीत : संजय राऊत

पूजा चव्हाण प्रकरण सरकार दडपण्याचा प्रकार करतंय- प्रवीण दरेकर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलताना म्हटलं की, पूजा आत्महत्या प्रकरण सरकार दडपतंय की काय? पूजा ही चक्कर येऊन पडली, तिने आत्महत्या केली असे वेगवेगळे अंदाज बांधले जातायत. परंतु त्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप,लॅपटॉप यांची चौकशी होत नाहीये. एवढेच काय तर त्या ऑडिओ क्लिप मधील बोलत असणाऱ्या अरुण राठोड या तरुणाच्या घरी चोरी झाल्याचं कळतंय. त्यामुळे या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची भीती असताना सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्यामुळे सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रकार करतंय की काय असा आरोप विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय.

Pooja Chavan Suicide Case|मुलीच्या मृत्यूमुळे उठलेल्या वादंगावर वडिलांची पहिली प्रतिक्रिया EXCLUSIVE 

दरम्यान पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी एबीपी माझाला आपली पहिली प्रतिक्रिया देताना माझ्या मुलीचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाला असल्याचं म्हटलं होतं. तसेच ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती आणि त्याचं कारण तिच्यावर असलेलं कर्ज होतं, असंही ते म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
BMC : वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget