एक्स्प्लोर
नालासोपाऱ्यातील शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे पुन्हा अडचणीत

वसई: नोटाबंदीनंतर 1 कोटीहून अधिकची रोकड जवळ बाळगल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलेले शिवसेनेचे नालासोपाऱ्यातील नगरसेवक पुन्हा अडचणीत आले आहेत. गावडेंसह 13 जणांवर जमीन खरेदीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस कागदपत्रे बनवुन संगनमतानं जमीन खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही आहे. नालासोपारामधील आचोळे येथील 26 गुंठे जागा 1987 मध्ये आपल्या वडिलांनी विकत घेतल्याचं तक्रारदार प्रमोद रल्हन यांनी म्हटलं आहे. सध्या या जागेवरुन न्यायालयात खटला चालू आहे. मात्र शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी ही जागा बनावट कागदोपत्राच्या आधारे बळकवल्याचं आरोप प्रमोद रल्हन यांनी केला आहे. दरम्यान, रितसर खरेदी खतानं ही जागा खरेदी केल्याचं धनंजय गावडेंनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे म्हटलं आहे. शिवाय अप्पर जिल्हाधिकारी जव्हार यांच्या न्यायालयात 9 जानेवारी 2017 रोजी गावडे यांच्या बाजूने निकाल लागल्याचेही सांगितले आहे. या सर्व घटनेचा तपास पोलीस करत असल्यामुळे घटनेतील सत्यता काय ते मात्र पोलीस तपासानंतरच कळणार आहे. संबंधित बातम्या नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या नगरसेवकाकडून लाखोंची रोकड जप्त
आणखी वाचा























