एक्स्प्लोर

फेसबुकच्या मदतीने बाईकचोर पोलिसांच्या जाळ्यात

मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या टीम-23 या टोळीतील काही जणांना पोलिसांनी थेट फेसबुकच्या मदतीने अटक केली आहे.

मीरारोड : मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या टीम-23 या टोळीतील काही जणांना पोलिसांनी थेट फेसबुकच्या मदतीने अटक केली आहे. ठाणे ग्रामीणच्या क्राईम ब्राँच टीमने या टोळीतील दोघांना अटक करुन त्यांच्याकडून 15 बाईक आणि दहा मोबाईल हस्तगत केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या टोळीने मीरारोड ते मुंबई परिसरातील अनेक मोबाईल आणि बाईक चोरल्या होत्या. त्यामुळे ही टोळी पोलिसांच्या हिट लिस्टवर होती. याच टोळक्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी देखील एक अनोखी शक्कल वापरली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा फोटो मिळवून त्यांना फेसबुकच्या माध्यामातून शोधून काढलं आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. फेसबुकच्या मदतीने बाईकचोर पोलिसांच्या जाळ्यात २० ते २२ वयोगटातील या चोरट्यांनी आपल्या चैनीसाठी बाईक आणि मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने टीम–२३ ही टोळी सुरु केली होती. सहा जणांच्या या टोळीत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. शहरातील बाईक चोरी रोखण्यासाठी पोलिसांचं एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बाईक चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याच सीसीटीव्हीतील फोटोच्या आधार घेत पोलिसांनी फेसबुकच्या माध्यमातून चोरट्याचा फोटो शोधून काढला आणि शुभम सिंह या युवकाला अटक केली. त्याच्यासोबतच एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या या टोळीच्या इतर साथीदारांचाही कसून शोध सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget