एक्स्प्लोर
Advertisement
नीरव मोदीकडे बँकेचे सिक्रेट पासवर्डही होते?
स्विफ्ट सिस्टमचा वापर करुन बँक परदेशात व्यवहार करतात. त्यासाठी काही सिक्रेट पासवर्ड असतात. हेच सिक्रेट पासवर्ड नीरव मोदी किंवा त्याच्या कंपनीतील काही लोकांना माहित असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
मुंबई : पीएनबी घोटाळ्याची व्याप्ती जास्त मोठी असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. कारण की, ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणी माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे प्रकरणं आणखी मोठं असल्याचं दिसून येत आहे.
केवळ बँकेचा माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीच्या मदतीने एवढा मोठा घोटाळा केला जाऊ शकत नसल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यांना असाही संशय आहे की, स्विफ्ट सिस्टमचा वापर करुन बँका परदेशात व्यवहार करतात. त्यासाठी काही सिक्रेट पासवर्ड असतात. हेच सिक्रेट पासवर्ड नीरव मोदी किंवा त्याच्या कंपनीतील काही लोकांना माहित असण्याची शक्यता आहे.
स्विफ्ट सिस्टमचा पासवर्ड नीरव मोदी किंवा त्याच्या कंपनीतील लोकांजवळ असणं याचा अर्थ असा की, आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकाचे व्यवहार आपल्या ताब्यात येणं.
जगभरात बँका या स्विफ्ट सिस्टमने एकमेकांशी जोडलेल्या असतात. याच्या मदतीनेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकांशी व्यवहार होतो. नीरव मोदीला देखील परदेशात कर्जाची परवानगी स्विफ्ट सिस्टमच्या माध्यमातूनच दिली जात होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना संशय आहे की, रक्कमेच्या अदलाबदलीसाठी स्विफ्ट मेसेजचा कोड नीरव मोदीच्या आणि त्याच्या काही लोकांना दिला गेला होता. त्यामुळे तिथूनच हे सारे फेरबदल केले जात होते.
दरम्यान, गोकुळनाथ शेट्टीच्या कम्प्युटर आणि सर्व्हिस फाईलमधून याप्रकरणी बऱ्याच मोठ्या गोष्टी हाती लागल्या आहेत. अशीही माहिती मिळाली आहे की, स्विफ्ट मेसेज बँकांच्या परदेशी शाखांना पाठवताना बदलले जात होते.
- समजा, नीरव मोदीला परदेशात 50 कोटींचं पेमेंट करायचं आहे.
- त्यावेळी गोकुळ शेट्टीने स्विफ्ट सिस्टममध्ये नीरव मोदीच्या नावे पन्नास कोटीच्याऐवजी फक्त पाच लाख रुपयांच्या कर्जाची एंट्री केली.
- पैसे कमी असल्याने त्याला तात्काळ परवानगी मिळायची.
- त्यानंतर गोकुळ शेट्टी अप्रुव्हल मेसेजमध्ये 5 लाखांऐवजी 50 कोटी एवढा आकडा करायचा.
- हा बदलेला आकडा तो स्विफ्ट सिस्टमच्या माध्यमातून परदेशी बँक शाखांना पाठवायचा.
- परदेशातील बँकेला अप्रुव्हल कोडसोबत पन्नास कोटीचं कर्ज दाखवलं जायचं.
- त्यामुळे बँक कोणतीही चौकशीविना नीरव मोदीला कर्ज देत होते.
अशा पद्धतीने स्विफ्ट मेसेज बदलून एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले जात होते. गोकुळ शेट्टी हा एकाच ब्राँचमध्ये तब्बल आठ वर्ष टिकून राहिला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात मोठा संशय निर्माण झाला आहे.
सूत्रांच्या मते, या प्रकरणाची चौकशी आता बँकेच्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन पोहचली आहे. कारण सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एका अधिकाऱ्याला एकाच ब्रँचमध्ये तीन वर्षाहून अधिक काळ ठेवता येत नाही. त्यामुळे या घोटाळ्यात आणखीही काही मोठे अधिकारी अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित बातम्या :
पीएनबी घोटाळा 20 हजार कोटींवर जाण्याची शक्यता
पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी
PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक
PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची टाच, 5 हजार कोटींचे हिरे जप्त PNB घोटाळा : दोषी कर्मचारी निलंबित, एमडी मेहतांची माहिती PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय? PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळालेपीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement