एक्स्प्लोर
PMC BANK SCAM | पीएमसी बँक घोटाळ्यात पहिलं राजकीय कनेक्शन उघड, माजी भाजप आमदाराच्या मुलाला अटक
4,355 कोटी रुपयांचा हा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले. ज्याचा फटका खातेदारांना बसला. आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले. ज्यामुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली. काही खातेदारांनी आपली आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवली होती. या तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यू सुद्धा झाला.
![PMC BANK SCAM | पीएमसी बँक घोटाळ्यात पहिलं राजकीय कनेक्शन उघड, माजी भाजप आमदाराच्या मुलाला अटक PMC BANK SCAM rajneet singh son of sardar tara singh arrested BJP PMC BANK SCAM | पीएमसी बँक घोटाळ्यात पहिलं राजकीय कनेक्शन उघड, माजी भाजप आमदाराच्या मुलाला अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/26174709/pmc-bank.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यात पहिलं राजकीय कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणात भाजपच्या माजी आमदार पुत्राला अटक करण्यात आली आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी राजनीत सिंग यांना अटक केली आहे. माजी भाजप आमदार तारा सिंग यांचे पुत्र राजनीत सिंग पीएमसी बँकेचे माजी संचालक आहेत. 4,355 कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन ऑडीटर्सना अटक केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांनी हल्लाबोल करत ही बँक बुडण्यामागे भाजपाच्याच लोकांचा हात असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार पहिलं राजकीय कनेक्शन राजनीत सिंग यांच्या रुपाने उघड झाले आहे.
पीएमसी बँकेत घोटाळा झाला तेव्हा जयेश संघानी आणि केतन लकडावाला स्टॅट्युटरी ऑडिटर होते. या घोटाळयात बँकेचे बडे अधिकारी गुंतले आहेत. बँकेत झालेल्या अनियमितता झाकण्यामध्ये जयेश आणि केतन या दोघांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक आणि बँकेच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
4,355 कोटी रुपयांचा हा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले. ज्याचा फटका खातेदारांना बसला. आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले. ज्यामुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली. काही खातेदारांनी आपली आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवली होती. या तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यू सुद्धा झाला.
पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यानंतर पीएमसी बँकेच्या खातेधारकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. कर्जवाटपात अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी राज ठाकरे यांनी हल्लाबोल करत ही बँक बुडण्यामागे भाजपाच्याच लोकांचा हात असल्याचा आरोप केला होता. आज अनेक बँका बुडत असून खातेदारांवर बँकेबाहेर जाऊन रडण्याची वेळ आली आहे. आज एकही व्यक्ती समाधानी दिसत नाही. खातेदार विनवण्या करत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. काही लोकांच्या अडचणी होत्या, कोणाची लग्न होती परंतु त्यांच्याच हक्काचे पैसे त्यांना मिळत नाहीत. पीएमसी बँक बुडाली, त्या बँकेच्या वरिष्ठ पदांवर भाजपाचेच लोक होते, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले होते. यानंतर मुंबईत आलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी घेराव घातला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)