एक्स्प्लोर
PMC BANK SCAM : आरोपी सुरजितसिंग अरोराला पोलीस कोठडी
विशेष म्हणजे डायरेक्टर असण्याच्या काळातच हा व्यवसाय वाढला असल्याचे समोर आले आहे. बँकेच्या लोन कमिटीमध्ये असताना अरोरा ह्यांनी एचडीआयएल सोबतच इतर 100 पेक्षा जास्त लोनला मंजूरी दिली आहे.
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचा चेअरमन सुरजित सिंग अरोराला आज किल्ला कोर्टात हजर केले. यावेळी कोर्टाने त्याला 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातली अरोराकडे बरीच माहिती आहे. मात्र तो माहिती देत नसल्याचीही माहिती समोर येत आहे. त्याची कसून चौकशी झाली तर पीडित खातेधारकांना न्याय मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात अटक सुरजितसिंग अरोरा हा 1999 पासून बँकेत डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. मात्र अरोरा ह्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे डायरेक्टर असण्याच्या काळातच हा व्यवसाय वाढला असल्याचे समोर आले आहे. बँकेच्या लोन कमिटीमध्ये असताना अरोरा ह्यांनी एचडीआयएल सोबतच इतर 100 पेक्षा जास्त लोनला मंजूरी दिली आहे. ज्याचे पैसे नंतर आलेच नाही आणि बँकेला तोटा झाला असल्याचीही माहिती आहे.
पीमएसी बँकेसंबंधी 30 ऑक्टोबरला आरबीआय निर्णय देणार
अरोराला एचडीआयएलच्या सर्व प्रक्रियेसंदर्भात माहिती आहे. मात्र तो तपास यंत्रणेला माहिती देत नसल्याचा दावा न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आला आहे. त्याचबरोबर अरोरा हा इतर आरोपींबाबत त्याचे संबंध आणि केलेल्या घोटाळ्याची माहिती देत नसल्याचं देखील म्हटलं आहे. अटकेत असलेला आरोपी जॉय थॉमस ह्याला पूर्णपणे अभय देण्याचं काम अरोराने लोन कमिटीमध्ये असताना केले होते. पीडित खातेधारकांना न्याय मिळावा म्हणून संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मागणी करत आहेत की ह्या प्रकरणाचा तपास माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली झाला पाहिजे.
पीएमसी घोटाळा हा जवळपास साडेचार हजार कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा आहे. याचा तपास मुंबई पोलिसच्या आर्थिक गुन्हे शाखेसोबतच ईडीचे अधिकारी करत आहेत. अरोरासोबतच्या इतर आरोपींची कसून चौकशी आणि त्यांची प्रॉपर्टी विकून खातेधारकांना न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे.
पीएमसी खातेधारक कशी साजरी करणार दिवाळी?, सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement