एक्स्प्लोर

PM Modi inaugurate Mumbai Metro Live updates : डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास: नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते आज मुंबईतील विविध विकास कामांच्या भूमीपूजन होणार आहे.

LIVE

Key Events
PM Modi inaugurate Mumbai Metro Live updates : डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास: नरेंद्र मोदी

Background

PM Modi inaugurate Mumbai Metro Live updates :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते आज मुंबईतील विविध विकास कामांच्या भूमीपूजन होणार आहे. मोदींच्या हस्ते महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण, 20 दवाखान्यांच्या लोकार्पणासह मलजल प्रक्रिया केंद्र, रुग्णालयांच्या इमारती, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण या कामांचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची बीकेसी येथे एक मोठी सभा देखील होणार आहे. यासाठी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

कसा असेल पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम 

आज पंतप्रधान 5 ते 6.10 एमएमआरडीए मैदानवरती लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहतील. संध्याकाळी 6.30 पंतप्रधान मोदी गुंदवली मेट्रो स्टेशन - 6.30 ते 7 मेट्रो उद्घाटन आणि मेट्रोतून प्रवास करणार. संध्याकाळी 7.5 मेट्रो स्टेशन मधून निघणार  7.15 मुंबई विमान तळावरून दिल्लीला रवाना होतील. सुरक्षतेची खबरदारी लक्षात घेता मेट्रो-1 ची सेवा बंद रहाणार. संध्याकाळी 5.45 ते 7.30 पर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे.

मुंबईतील वाहतुकीतीबाबत वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून वेळोवेळी माहिती मिळणार आहे. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एम एम आर डी ए मैदान आणि मेट्रो सात मार्गिका गुंदवली आणि मोगरापाडा स्थानका दरम्यान ड्रोन, पॅरागलाईडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

हे मार्ग असणार बंद 

मुंबई वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमीली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी राहणार आहे. संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाता येणार नाही. खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाता येणार नाही. सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलींकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेश बंदी असेल. संपूर्ण बीकेसी परिसरामध्ये कोणीही त्यांची वाहने कोणत्याही रस्त्यांवर पार्किंग करणार नाहीत.

19:15 PM (IST)  •  19 Jan 2023

Narendra Modi Mumbai Visit: नरेंद्र मोदींचा गुंदवली ते मोगरापाडा दरम्यान मेट्रो प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी गुंदवली ते मोगरापाडा या दरम्यान मेट्रोचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी तरुण आणि महिलांशी संवाद साधला.

18:25 PM (IST)  •  19 Jan 2023

Narendra Modi Mumbai Visit: डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास: नरेंद्र मोदी

देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील रेल्वे स्टेशनही आता विमानतळांसारखी होऊ लागल्याचं पंतप्रधान म्हणाले.

18:19 PM (IST)  •  19 Jan 2023

मुंबईच्या विकासाला गती देणार: पंतप्रधान मोदी

आज मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते म्हणाले की, मुंबईच्या विकासाला गती देणार.

17:50 PM (IST)  •  19 Jan 2023

मविआच्या काळत राज्याचा विकास ठप्प झाला: मुख्यमंत्री

मविआच्या काळत राज्याचा विकास ठप्प झाला, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. 

17:48 PM (IST)  •  19 Jan 2023

काहींना मेट्रोचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करायची इच्छा नव्हती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मोदींनी मेट्रोचं भूमिपूजन केलं तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, काहींना मेट्रोचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करायची इच्छा नव्हती. पण नियतीसमोर काही चालत नाही,  असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफनBalasaheb Thorat : विरोधीपक्ष नेता कुणाला करायचा याची चर्चा सुरु करा; फडणवीसांना टोलाAkshay Shinde Funeral Badlapur : अक्षय शिंदेच्या आई, वडिलांनी मृतदेह ताब्यात घेतलाABP Majha Headlines : 05 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
Embed widget