'मन की बात'ची आज शंभरी; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, विलेपार्लेतील कार्यक्रमाला हजर राहणार
Amit Shah on Mumbai Tour: पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची शंभरीकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, विलेपार्लेतील कार्यक्रमाला हजर राहणार
Amit Shah on Mumbai Tour: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आज मुंबई (Mumbai News) दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरू केलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाची शंभरी पूर्ण होणार आहे. यानिमित्त मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. विलेपार्लेतील 'मन की बात' कार्यक्रम लाईव्ह प्रसारित केला जाणार असून याच कार्यक्रमाला अमित शाह हजेरी लावणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'ची आज शंभरी आहे. मुंबईत त्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपचे अनेक बडे नेते ठिकठिकाणी या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील आज मुंबई दौऱ्यावर आहेत. विलेपार्ले मधील म.ल.डहाणूकर महाविद्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. याच कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजेरी लावणार आहेत.
शंभराव्या 'मन की बात'निमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन
गृहमंत्री अमित शहा रविवारी मुंबईतील विलेपार्ले येथे 'मन की बात' निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर पियुष गोयल कांदिवलीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ प्रसारणाचा शंभरावा भाग 'अभूतपूर्व' जनसंपर्क कार्यक्रम बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पीएम मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्यांच्या मासिक प्रसारणादरम्यान अनेक मुद्द्यांवर बोलतात. हा कार्यक्रम 2014 मध्ये सुरू झाला होता.
पाहा व्हिडीओ : Mann ki Baat 100 episode : मन की बातचे 100 भाग, भाजपकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासून सातत्यानं 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या अंतिम रविवारी जनतेशी संवाद साधतात. आज मन की बात शंभरीत पदार्पण करीत आहे. त्यामुळे त्याची जय्यत तयारी सुरू आहे. देशवासियांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या कल्पना, समस्या आणि मतं ऐकणं या उद्देशानं मोदींनी 'मन की बात' हा कार्यक्रम सुरु केला होता. आज या मन की बातची शंभरी पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईसह उपनगरातल्या 5 हजारांहून अधिक ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.