एक्स्प्लोर
Advertisement
नव्या महापौर बंगल्यासाठी मुंबई मनपाचा प्लॅन बी तयार!
दादरच्या शिवाजी पार्कवरील म्युनिसिपल जिमखान्याच्या जागेवर नवा महापौर बंगला बांधण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आयुक्तांना भेटून विरोध दर्शवला आहे.
मुंबई : महापौर बंगल्यासाठी मुंबई आयुक्तांचा प्लॅन बी तयार आहे. नव्या महापौर बंगल्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्सजवळील 12 हजार स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर नवा महापौर बंगला बांधता येईल का याबाबत महापालिका प्रशासनाचा विचार सुरु आहे.
दादरच्या शिवाजी पार्कवरील म्युनिसिपल जिमखान्याच्या जागेवर नवा महापौर बंगला बांधण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आयुक्तांना भेटून विरोध दर्शवला आहे. यानंतर महापालिका प्रशासनाने महापौरांच्या नव्या बंगल्यासाठी पुन्हा नव्या जागेचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे यापूर्वी चर्चेत असलेली ही जागा आता नव्या महापौर बंगल्यासाठी निश्चित होऊ शकते.
मुंबईचे महापौर राणीच्या बागेतील बंगल्यात राहणार
बंगल्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्सजवळचा भूखंड का?
- महालक्ष्मी रेसकोर्सजवळचा हा भूखंड केशवराव खाडे मार्गावर आहे.
- ही जागा दक्षिण मुंबईतील मध्यवर्ती भागात आहे.
- हा भूखंड 12 हजार स्क्वेअर मीटर आहे. म्हणजेच सध्याच्या शिवाजी पार्कच्या महापौर बंगल्यापेक्षाही मोठा आहे. सध्याचा महापौर बंगला हा 11 हजार 550 स्क्वेअर मीटर जागेवर आहे.
- तर आधी चर्चेत असलेली शिवाजी पार्कवरच्या म्युनिसिपल जिमखान्याची जागा केवळ 2400 स्क्वेअर मीटरवर आहे.
- त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्स हीच जागा महापौर बंगल्यासाठी पसंती असू शकेल.
संबंधित बातम्या
महापौरांसाठी महालक्ष्मीत बंगला बांधा, भाजपची मागणी
शासनाने आदेश दिल्यास मिनिटात बंगला सोडेन : दराडे
मलबार हिलचा बंगला पालिका महापौरांसाठी काढून घेणारच!
राहिले दूर घर माझे, मलबार हिलचा बंगला महापौरांना नाही?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement