एक्स्प्लोर

मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्यासाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्यासाठी नियोजन करा, वर्क फ्रॉम होमची परिणामकारक यंत्रणा निर्माण करा, तसेच मंत्रालयीन सर्व कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील, तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तत्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी आज वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग. दि कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तसेच मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, "आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू ज्यामध्ये कामं पण संपूर्ण क्षमतेने आणि व्यवस्थित पार पडतील. तसेच कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वांना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे.

मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

अभ्यागतांना मर्यादित प्रवेश

मंत्रालयात दररोज अभ्यागतांची संख्या मधल्या काळात खूप वाढली आहे हे महासंघाने यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, यावर काही प्रमाणात प्रतिबंध असणे गरजेचे आहे, यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक दोन दिवसांत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

आरोग्य तपासणी

मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणे करून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येऊ शकेल यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sanjay Rathod | कोविडविषयक नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गर्दीबाबत तात्काळ कारवाई करा : मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena : यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार; निलंबनाच्या कारवाईनंतर साहेबराव कांबळेसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश, एकनाथ शिंदे म्हणाले...
यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार; निलंबनाच्या कारवाईनंतर साहेबराव कांबळेसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश, एकनाथ शिंदे म्हणाले...
मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त इंधन, E85 फ्लेक्स फ्युएल कोणत्या गाड्यांमध्ये वापरता येणार?
पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त इंधन, E85 फ्लेक्स फ्युएल कोणत्या गाड्यांमध्ये वापरता येणार?
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar : सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे, शरद पवारांचं कोल्हापूरमध्ये महत्त्वाचं वक्तव्य
सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे : शरद पवार
Buldhana Police: बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
LPG Price Hike: घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Embed widget