एक्स्प्लोर

उडत्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट पती-पत्नीचं घरगुती भांडण

'पायलट आणि सहपायलटमध्ये गैरसमजूतीतून वाद झाला. हा वाद सोडवण्यात आला. विमान सुरक्षितरित्या मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं' अशी माहिती जेट एअरवेजने दिली आहे.

नवी दिल्ली :  विचार करा, विमानात तुम्ही हजारो फूट उंचीवर आहात.. अचानक तुमच्या आजूबाजूला भांडणाचे आवाज यायला लागले... काही वेळ तुम्ही त्याकडे कानाडोळा कराल, मात्र हे भांडण दोन पायलटमध्ये सुरु असेल तर? त्यातही ते वैमानिक पती-पत्नी असतील आणि कॉकपिटमध्ये आपल्या वैयक्तिक भांडणातून शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असतील तर? लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानात असाच काहीसा प्रकार घडला आणि सुदैवाने मोठा विमान अपघात टळला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जेट एअरवेजचं 9W119 हे विमान 324 प्रवाशांसह लंडनहून मुंबईला येत होतं. विशेष म्हणजे विमानाचे पायलट हे प्रत्यक्षात पती-पत्नी होते. सुरुवातीला सगळं काही सुरळीत सुरु होतं, मात्र अचानक महिला सहवैमानिक कॉकपिटमधून रडत बाहेर आली. पायलटच्या डोळ्यात अश्रू पाहून केबिन क्रूही आश्चर्यचकित झाले. पुरुष वैमानिकाने आपल्याला कानशिलात लगावल्याचं तिने सांगितलं. तिच्या पाठोपाठ पुरुष वैमानिकही तिची समजूत काढण्यासाठी बाहेर आला आणि क्षणभरात सर्वांचे धाबे दणाणले. कॉकपिटमध्ये काही कालावधीसाठी पायलट नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सर्वांच्या मनात भीती चमकून गेली. दोघांना केबिन क्रूने पुन्हा कॉकपिटमध्ये पिटाळलं. केबिन क्रूचा जीव भांड्यात पडला, पण पहिला वाद शमतो न शमतो, तोच महिला वैमानिक पुन्हा रडत बाहेर आली. तिची कशीबशी समजूत घालण्यात आली. तिला कॉकपिटमध्ये पिटाळलं. अखेर विमान जेव्हा मुंबई विमानतळावर सुरक्षितरित्या उतरलं, तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. 'पायलट आणि सहपायलटमध्ये गैरसमजूतीतून वाद झाला. हा वाद सोडवण्यात आला. विमान सुरक्षितरित्या मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं' अशी माहिती जेट एअरवेजने दिली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही पायलटना डीजीसीएने तात्पुरतं हवाईसेवेपासून निलंबित करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget