एक्स्प्लोर

'फुलं पडली'ऐवजी 'पूल पडला' ऐकलं आणि गोंधळ उडाला!

फुलं पडली याऐवजी पूल पडला असं ऐकण्यात आलं आणि एलफिन्स्टन पुलावर गोंधळ उडाला. याच गोंधळातून चेंगराचेंगरीची घटना घडली, असा दावा एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थिनीने केला आहे.

मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन स्टेशनवरील फुटओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांनी जीव गमावला. मात्र या घटनेचा एक छोटीशी अफवा जबाबदार होती, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. फुलं पडली या ऐवजी पूल पडला असं ऐकण्यात आलं आणि गैरसमज होऊन सर्वांनी धावपळ सुरु केली. त्यामुळे ही घटना घडली, असा दावा या दुर्घटनेत वाचलेल्या शिल्पा विश्वकर्मा या विद्यार्थिनीने केला आहे. पाऊस, त्यामुळे पादचारी पुलावर झालेली गर्दी आणि त्यातच पूल पडल्याची अफवा, हे चेंगराचेंगरीचं कारण पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात फुलं वाहून नेण्यात येत होती. पायऱ्यांवर फुलं पडली होती. फुलं पडली हे पूल पडला असं ऐकण्यात आलं आणि एकच गोंधळ उडाला. शिल्पा नेहमीप्रमाणे विले पार्ले येथे अभियांत्रिकीच्या क्लाससाठी चालली होती. पाऊस असल्यामुळे पुलाचा आधार घेत सर्व जण चालले होते. पुलाच्या तिकीट खिडकीकडील भागाकडे डोक्यावर फुलं वाहून नेणारी एक व्यक्ती होती. डोक्यावरील गोणीतून फुलं पडताच ‘फुलं पडली’ असा आवाज आला. मात्र काहींना फुलांऐवजी पूल पडला असा गैरसमज निर्माण होऊन गोंधळ उडाला. या सर्व गोंधळात एका व्यक्तीचा पाय सरकला आणि अनेक जण हळूहळू एकमेकांवर पडू लागल्याचं शिल्पाने सांगितलं. सकाळी 10.15  च्या सुमारास उडालेल्या या गोंधळानंतर चेंगराचेंगरी सुरू झाली, अशी माहिती शिल्पाने दिली. याच चेंगराचेंगरीने 23 जणांचा जीव घेतला. चेंगराचेंगरीत मुंबईकरांचा बळी एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kim Jong Un: चीनमध्ये हुकूमशहा किम जोंग बसल्या जागेवरून उठताच बाॅडीगार्ड तोंडाला लावलेला ग्लास, बूटही घेऊन गेले, ठसेही पुसले, हा प्रकार का घडला?
Video: चीनमध्ये हुकूमशहा किम जोंग बसल्या जागेवरून उठताच बाॅडीगार्ड तोंडाला लावलेला ग्लास, बूटही घेऊन गेले, ठसेही पुसले, हा प्रकार का घडला?
Nashik Crime : दारू प्यायला पैसे मागितले, नकार देताच नवऱ्याकडून बायकोच्या डोक्यात हातोडीने वार; नाशिकमधील घटनेने खळबळ
दारू प्यायला पैसे मागितले, नकार देताच नवऱ्याकडून बायकोच्या डोक्यात हातोडीने वार; नाशिकमधील घटनेने खळबळ
विश्वासघातकी बदलणार नाहीत! निवडणुकीच्या तोंडावरच NDA मधील घटकपक्षानं तडकाफडकी साथ सोडली
विश्वासघातकी बदलणार नाहीत! निवडणुकीच्या तोंडावरच NDA मधील घटकपक्षानं तडकाफडकी साथ सोडली
Bacchu Kadu : देवेंद्रजी तुम्ही अन् भाजपवाले पटाईत, ईडीत कुणाला फसवायचं हे चांगलं जमतं, मात्र...; बच्चू कडूंचा सडकून प्रहार
देवेंद्रजी तुम्ही अन् भाजपवाले पटाईत, ईडीत कुणाला फसवायचं हे चांगलं जमतं, मात्र...; बच्चू कडूंचा सडकून प्रहार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Threat Women Officer : अॅक्शन घेईन,कायद्याने वागणाऱ्या महिला अधिकाऱ्याला अजितदादांची धमकी
Chhagan Bhujbal Home Security :छनग भुजबळांच्या आक्रमक भूमिकेनंतर निवासस्थानी पोलीस बंदोबस्त
City Sixty Superfast news : सिटी सिक्स्टी वेगवान बातम्या : 04 Sep 2025 : ABP Majha
Vishwajit Kadam On Congress : आज ना उदया काँग्रेस सत्तेत येईल, विश्वजीत कदमांनी शड्डू ठोकला
Maratha Reservation GR : जीआर बदलण्याचा विनाकरण बदलण्याचा संभ्रम निर्माण करत आहेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kim Jong Un: चीनमध्ये हुकूमशहा किम जोंग बसल्या जागेवरून उठताच बाॅडीगार्ड तोंडाला लावलेला ग्लास, बूटही घेऊन गेले, ठसेही पुसले, हा प्रकार का घडला?
Video: चीनमध्ये हुकूमशहा किम जोंग बसल्या जागेवरून उठताच बाॅडीगार्ड तोंडाला लावलेला ग्लास, बूटही घेऊन गेले, ठसेही पुसले, हा प्रकार का घडला?
Nashik Crime : दारू प्यायला पैसे मागितले, नकार देताच नवऱ्याकडून बायकोच्या डोक्यात हातोडीने वार; नाशिकमधील घटनेने खळबळ
दारू प्यायला पैसे मागितले, नकार देताच नवऱ्याकडून बायकोच्या डोक्यात हातोडीने वार; नाशिकमधील घटनेने खळबळ
विश्वासघातकी बदलणार नाहीत! निवडणुकीच्या तोंडावरच NDA मधील घटकपक्षानं तडकाफडकी साथ सोडली
विश्वासघातकी बदलणार नाहीत! निवडणुकीच्या तोंडावरच NDA मधील घटकपक्षानं तडकाफडकी साथ सोडली
Bacchu Kadu : देवेंद्रजी तुम्ही अन् भाजपवाले पटाईत, ईडीत कुणाला फसवायचं हे चांगलं जमतं, मात्र...; बच्चू कडूंचा सडकून प्रहार
देवेंद्रजी तुम्ही अन् भाजपवाले पटाईत, ईडीत कुणाला फसवायचं हे चांगलं जमतं, मात्र...; बच्चू कडूंचा सडकून प्रहार
'हा सरसकट जीआर नाही, पुराव्यांचा GR, मी भुजबळांना आश्वस्त केलंय'; मुख्यमंत्र्यांनी सांगितला शासन निर्णयाचा अर्थ
'हा सरसकट जीआर नाही, पुराव्यांचा GR, मी भुजबळांना आश्वस्त केलंय'; मुख्यमंत्र्यांनी सांगितला शासन निर्णयाचा अर्थ
मोठी बातमी! मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, 5 सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कधी?
मोठी बातमी! मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, 5 सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कधी?
Ajit Pawar Threat Women Officer : अॅक्शन घेईन,कायद्याने वागणाऱ्या महिला अधिकाऱ्याला अजितदादांची धमकी
Ajit Pawar Threat Women Officer : अॅक्शन घेईन,कायद्याने वागणाऱ्या महिला अधिकाऱ्याला अजितदादांची धमकी
बेकायदा मुरुम उपशाला पाठबळ, लाडक्या बहि‍णींचा भाऊ म्हणणारे अजित दादा धटींगशाही करतात; शेतकरी संघटना आक्रमक
बेकायदा मुरुम उपशाला पाठबळ, लाडक्या बहि‍णींचा भाऊ म्हणणारे अजित दादा धटींगशाही करतात; शेतकरी संघटना आक्रमक
Embed widget