एक्स्प्लोर
लोकलमध्ये चढण्याच्या वादातून प्रवाशाला मारहाण, कल्याण स्टेशनवरील प्रकार
धक्कादायक म्हणजे बाविस्करने मारहाण करताना आपण पोलीस असल्याची बतावणी केली, मात्र नंतर तो खोटं बोलत असल्याचं उघड झालं.
कल्याण : लोकलमध्ये चढण्याच्या वादातून प्रवाशाला मारहाण केल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या प्रवाशाला अटक केली आहे. दिलीप माळी असं मारहाण झालेल्या प्रवाशाचं नाव असून ते रसायनीला राहणारे आहेत.
दिलीप माळी आज सकाळी भिवंडीला जाण्यासाठी ते दिव्याहून कल्याणला यायला निघाले. मात्र ट्रेन कल्याण स्टेशनमध्ये शिरताच काही प्रवासी धावत्या लोकलमध्ये चढू लागले. यावेळी माळी आणि या प्रवाशांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच रवी बाविस्कर या प्रवाशाने माळी यांना मारहाण केली. या मारहाणीत माळी यांच्या डोळ्याजवळ दुखापत झाली असून तीन टाके पडले आहेत.
धक्कादायक म्हणजे बाविस्करने मारहाण करताना आपण पोलीस असल्याची बतावणी केली, मात्र नंतर तो खोटं बोलत असल्याचं उघड झालं. याप्रकरणी कल्याण लोकमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बाविस्कर याला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement