एक्स्प्लोर

‘मुलगा जिवंत पाहिजे, तर 50 लाख रुपये द्या’, एका बोगस अपहरणाची पोलखोल

मुलाला जिवंत पाहायचे असल्यास 50 लाख रुपये देण्याची आणि त्याचसोबत यासंदर्भात कुणालाही न सांगण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं.

पालघर : मित्रांची संगत, किंमती मोबाईल, फिरण्याची हौस या साऱ्यांमुळे तलासरीमधील एका मुलाने चक्क स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि वडिलांकडे मित्राकरवी 50 लाखांची मागणी केली. या बोगस अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश तलासरी पोलिसांनी केला आहे. तलासरीमधील कापड व्यापारी दिनेश प्रजापती यांना 22 तारखेच्या रात्री फोन आला. त्यांचा 17 वर्षीय मुलगा दिनेश याचं अंधेरीतून अपहरण केल्याचं समोरुन सांगण्यात आलं आणि मुलगा जिवंत हवा असल्यास 50 लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली. दिनेश प्रजापती यांनी सर्व प्रकार तलासरी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचं गांभिर्य ओळखलं आणि तातडीने तीन टीम तयार केल्या. दिनेश प्रजापती यांच्या मदतीने मुलाला सोडवण्यासाठी एक प्लॅन आखण्यात आला. मुलाला जिवंत पाहायचे असल्यास 50 लाख रुपये देण्याची आणि त्याचसोबत यासंदर्भात कुणालाही न सांगण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. स्थानिक अन्वेषण शाखा पालघर आणि तलासरी पोलिसांच्या तिन्ही टीमने वडिलांना येणाऱ्या फोनप्रमाणे करण्यास सांगत, रिकामी बॅग घेण्यास सांगितली आणि अपहरणकर्त्याने सांगितल्याप्रमाणे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बोईसर, त्यांनतर चिल्लरफाटा, सिमला हॉटेल, मनोरपर्यंत दिनेश प्रजापती यांच्या गाडीचा माग घेत पोलिसांनी सापळा लावला. मात्र अपहरणकर्ता फोनवर या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे घेण्यासाठी जागा बदलत होता आणि अखेर त्याने मनोर येथे पैसे ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे रिकामी बॅग पेट्रोलपंप शेजारील निर्जनस्थळी ठेवली आणि पोलिसांनी त्याला पैशाची बॅग घेण्यासाठी येण्याची संधी दिली. अपहरणकर्ता आला खरा, मात्र रिकामी बॅग पाहून त्याने पुन्हा जवळच असलेल्या लक्ष्मी लॉजकडे निघून गेल्याने पोलिसांनी लॉजला बाहेरून घेराव घालत, एका रुममधून अपहरण झालेला भूमिका प्रजापती आणि अपहरणकर्ता असीम इकबाल शेख याला ताब्यात घेत सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांना पाहताच अपहरणकर्ता असीम शेख भूमिक प्रजापतीनेच अपहरणाचा कट रचला असून त्याच्या सांगण्यावरुनच 50 लाखांची मागणी करणारा फोन केल्याचं कबूल केलं आणि अपहरणाचा बनाव उघड झाला. भूमिक प्रजापती हा उंबरगाव येथे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. मात्र शिकवणीसाठी काही महिन्यांपूर्वीच त्याला अंधेरी येथील नातेवाईकांकडे पाठविण्यात आले होते. मौजमजा, किंमती मोबाईल इत्यादीसाठी तलासरीमधील मित्र असीम शेख याच्या मदतीने अपहरणाचा बनाव करण्याचा कट स्वतःच भूमिकने रचला असल्याचं समोर आलं. 22 सप्टेंबर रोजी अंधेरी येथे अपहरणाचा गुन्हा 531/17 , 363 प्रामाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यप्रामाणे दोघांना अंधेरी साकिनाका पोलिसांच्या तांब्यात देण्यात आलं असून अधिक तपास अंधेरी पोलिस करीत आहेत . या अपहरणनाट्यात असीम शेख याच्यासह आणखी काही मित्र सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget