एक्स्प्लोर
ओव्हरहेड वायरला हात लावून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम
रेल्वे प्रशासनाला ही बाब लक्षात येतात तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे या तरुणाचे प्राण थोडक्यात वाचले.
मुंबई : पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेवरील बोईसर रेल्वे स्थानकात एका तरुणाने ओव्हरहेड वायरला स्पर्श करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वेने तातडीने वीजपुरवठा खंडित केल्याने तरुण बचावला. मात्र तरुणाच्या या प्रयत्नामुळे पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.
मोहम्मद तमने (वय 23 वर्ष) असं या माथेफिरु तरुणाचं नाव असून तो मूळचा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. बोईसर रेल्वे स्थानकातील फूटओव्हर ब्रीजवर चढून या माथेफिरुने हातात चाकू घेत रेल्वेच्या 25000 व्होल्ट क्षमतेच्या वायर जवळ उभं राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वे आणि अग्निशमनदलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
माथेफिरु तरुणाने घातलेल्या गोंधळामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कुटुंबीयांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं मोहम्मदचं म्हणणं आहे.
रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांना दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहम्मदला पकडण्यात यश आलं. या आत्महत्या नाट्यामुळे वीजप्रवाह खंडित केल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement