एक्स्प्लोर

Exclusive : कॉपीबहाद्दरांचा पंचनामा! ABP माझाच्या बातमीनंतर परीक्षामाफियांची घाबरगुंडी; WhatsApp चॅट हाती

Online Exam Scam case Mumbai : एबीपी माझानं ऑनलाईन परीक्षेत होणाऱ्या कॉपीचा पर्दाफाश केल्यानंतर, या कॉपीबहाद्दरांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर एबीपी माझाच्या बातमीविरोधात मोहीम सुरु केली आहे.

मुंबई :  एबीपी माझानं ऑनलाइन परीक्षेत कॉपीबहाद्दरांचा पंचनामा केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठानं एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठ आता टप्प्याटप्प्यानं ऑनलाईन परीक्षांचा (Online Exam Scam) पर्याय थांबवणार आहे. मुंबई विद्यापीठाचे व्यावसायिक अभ्यासक्रम अर्थात इंजीनियरिंग, फार्मसी, लॉ, एमबीए यांच्या  परीक्षा पुढील सेमिस्टर पासून पूर्णपणे ऑफलाइन करण्यासाठी विद्यापीठाचं नियोजन सुरू आहे. ऑनलाइन परीक्षा मध्ये कॉपी होते हे प्रकरण गंभीर असून याची कल्पना शिक्षकांना असली तरी घरी विद्यार्थी सहजपणे कॉपी करू शकतात आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करता त्याला आळा घालण्यासाठी आता मुंबई विद्यापीठानं (Mumbai University) पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

कॉपीबहाद्दरांकडून व्हॉट्सअॅप ग्रुपवर बातमीविरोधात मोहीम 

एबीपी माझानं ऑनलाईन परीक्षेत होणाऱ्या कॉपीचा पर्दाफाश केल्यानंतर, या कॉपीबहाद्दरांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर एबीपी माझाच्या बातमीविरोधात मोहीम सुरु केली आहे. ही बातमी ब्लॉक करण्यासाठी आपल्या ग्रुप मेंबर्सना चिथावू लागले. एबीपी माझानं केलेल्या बातमीचा व्हिडीओ यूट्यूबवर रिपोर्ट करण्याचं आवाहन ग्रुपमधील काही लोक करत आहेत. जेणेकरुन व्हिडीओ ब्ल़ॉक झाल्यानंतर कमीत कमी लोकांपर्यंत जाईल असं असे मेसेज देखील ग्रुपवर केले जात आहेत. एबीपी माझाकडे या ग्रुपमधील काही स्क्रिनशॉट आले आहेत. याबाबतचे काही स्क्रिनशॉट आम्ही खाली देत आहोत. 

Exclusive : कॉपीबहाद्दरांचा पंचनामा! ABP माझाच्या बातमीनंतर परीक्षामाफियांची घाबरगुंडी; WhatsApp चॅट हाती

Exclusive : कॉपीबहाद्दरांचा पंचनामा! ABP माझाच्या बातमीनंतर परीक्षामाफियांची घाबरगुंडी; WhatsApp चॅट हाती
Exclusive : कॉपीबहाद्दरांचा पंचनामा! ABP माझाच्या बातमीनंतर परीक्षामाफियांची घाबरगुंडी; WhatsApp चॅट हाती

Exclusive : कॉपीबहाद्दरांचा पंचनामा! ABP माझाच्या बातमीनंतर परीक्षामाफियांची घाबरगुंडी; WhatsApp चॅट हाती

Exclusive : कॉपीबहाद्दरांचा पंचनामा! ABP माझाच्या बातमीनंतर परीक्षामाफियांची घाबरगुंडी; WhatsApp चॅट हाती

ऑनलाइन परीक्षांमध्ये सर्रास कॉपी होत असल्याचा प्रकार उघडकीस

मागील दोन वर्षांपासून विद्यापीठ, महाविद्यालयात ऑनलाइन परीक्षा होत आहेत. मात्र, या परीक्षांमध्ये मिळणारे गुण कितपत ग्राह्य धरायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, पदवी पदव्युत्तर ऑनलाइन परीक्षांमध्ये सर्रास कॉपी होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला. एबीपी माझाने कॉपी बहाद्दरांचा पर्दाफाश केला होता. इंजिनिअरिंग असो किंवा मग लॉ चा पेपर, बीकॉम असूद्यात किंवा बीएससी जवळपास सर्वच अभ्यासक्रमांमध्ये पैसे मोजून ऑनलाईन परीक्षामध्ये कॉपीबहाद्दर कॉपी करून चांगल्या गुणांनी पास होत आहेत. 

एबीपी माझाच्या टीमला ऑनलाईन पेपरमध्ये कॉपी होत असल्याच्या तक्रारीचा कॉल आला होता.  विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी आणि पास करण्यासाठी काही विद्यार्थी पैसे सुद्धा घेत असल्याचं या कॉलमधून समजले. यानंतर एबीपी माझानं नेमका या परीक्षांमध्ये ऑनलाइन कॉपीचा प्रकार कसा घडतो ? हे उघडकीस आणले.

टप्प्याटप्प्याने ऑनलाइन परीक्षांचा पर्याय थांबवण्याचा विचार
ऑनलाइन परीक्षा मध्ये कॉपी होते हे प्रकरण गंभीर असून याची कल्पना शिक्षकांना असली तरी घरी विद्यार्थी सहजपणे कॉपी करू शकतात आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करताय. त्यामुळे नाईलाजास्तव सरसकट नाही तर टप्प्याटप्प्याने ऑनलाइन परीक्षांचा पर्याय आता थांबवण्याचा विचार विद्यापीठ करत आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या ( इंजीनियरिंग, फार्मसी, लॉ, एमबीए एमसीए यांसारखे अभ्यासक्रम)  परीक्षा पुढील सेमिस्टर पासून पूर्णपणे ऑफलाइन होतील, त्यासाठीचे नियोजन विद्यापीठ करत आहे. टप्प्या-टप्प्याने आम्ही ऑनलाईन परीक्षा बंद करून ऑफलाईन परीक्षेकडे जात आहोत - डॉ. विनोद पाटील, मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक 

नेमकं कसं चालतं हे रॅकेट याचा व्हिडीओ पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 31 Dec 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
Walmik Karad: 'कडक कपडे घालून शानमध्ये येणार, वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार'; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
'वाल्मिक कराड आज शरण येणार, कडक कपडे घालून शानमध्ये येणार...'; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
Walmik Karad: वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद, 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद, 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु
Embed widget