एक्स्प्लोर
25 डिसेंबरला कल्याण ते डोंबिवली चार तास लोकलसेवा बंद
कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक पाच तास पूर्णपणे बंद राहणार असून एकूण 16 मेल एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. या ब्लॉकचा परिणाम एक्स्प्रेसवरही होणार आहे.

मुंबई : ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर बुधवारी (25 डिसेंबर) विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी 9.45 ते दुपारी 1.45 या काळात 100 मेट्रिक टन वजनी 6 मीटर रुंदीचे 4 गर्डर उभारण्याचे काम करण्यात येईल. यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक पाच तास पूर्णपणे बंद राहणार असून एकूण 16 मेल एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. या ब्लॉकचा परिणाम एक्स्प्रेसवरही होणार आहे.
लोकल सेवेवर परिणाम
कल्याण-डोंबिवली दरम्यान सकाळी 9.15 ते दुपारी 1.45 या वेळेत लोकल वाहतूक राहणार बंद
दर 20 मिनिटांनी कल्याण-कर्जत/कसारा या मार्गावर विशेष फेऱ्या
दर 15 मिनिटांनी डोंबिवली/ठाणे-सीएसएमटी विशेष फेऱ्या
सीएसएमटी-दादर, कुर्ला, ठाणे या लोकल फेऱ्या वेळापत्रकानुसार
25 डिसेंबरला या मेल-एक्स्प्रेस राहणार रद्द
सीएसएमटी-पुणे सिंहगड ( 11009- 11010 )
सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन ( 12123-12124)
सीएसएमटी-मनमाड पंचवटी ( 12109- 12110)
सीएसएमटी-मनमाड राज्यराणी ( 22101-22102)
दादर-जालना जनशताब्दी ( 12071-12072)
सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी ( 11029- 11030)
सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर ( 51153- 51154)
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
























