एक्स्प्लोर
...तर ‘मातोश्री’समोरही फेरीवाले उभे करु : नितेश राणे
‘आमच्या घरासमोर फेरीवाले बसवाच, मग मातोश्रीबाहेर कसे फेरीवाले उभे करायचे हे आम्हालाही माहित आहे.’
मुंबई : मुंबईतल्या फेरीवाल्यांवरुन पुन्हा एकदा ठाकरे आणि राणे कुटुंबीयांमध्ये नवा संघर्ष सुरु झाला आहे. ‘आमच्या घरासमोर फेरीवाले बसवाच, मग मातोश्रीबाहेर कसे फेरीवाले उभे करायचे हे आम्हालाही माहित आहे.’ अशा शब्दात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.
मुंबई महापालिकेनं फेरीवाला क्षेत्रासंबंधात नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार नारायण राणे, राज ठाकरेंच्या घरासमोर फेरीवाले बसणार आहेत. पण उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर मात्र फेरीवाल्यांना बंदी असेल. त्यामुळे मनसे आणि राणे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार केले आहेत. यामध्ये दिग्गज सेलिब्रेटींच्या घराबाहेर फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण मिळणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासाप्रमाणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे, अभिनेता आमीर खान आणि संजय दत्त यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना महापालिकेने जागा देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पण उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर मात्र फेरीवाल्यांना बंदी असेल.
याचवरुन आता मनसे आणि राणेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
कुठे कुठे फेरीवाल्यांच्या जागा प्रस्तावित?
मुंबई महापालिकेकडून 1366 रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून प्रस्तावित
85 हजार 891 फेरीवाल्यांच्या जागा प्रस्तावित
फेरीवाला क्षेत्रासाठी 10 फुटांचा फूटपाथ आवश्यक
शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयांपासून 100 मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही
रेल्वे स्टेशनपासून 150 मीटर अंतरावर फेरीवाला क्षेत्र होणार नाही
अभिनेता आमीर खानचं निवासस्थान असलेल्या हिल रोड 12वा रस्ता, या ठिकाणी 10 फेरीवाल्यांसाठी जागा
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणेंच्या जुहूतील तारा रोड परिसरात घराबाहेर 36 फेरीवाले प्रस्तावित
अभिनेता संजय दत्तचे निवासस्थान असलेल्या पाली हिल रस्त्यावर 10 फेरीवाल्यांसाठी जागा
'कृष्णकुंज'बाहेरील दोन रस्त्यांवर प्रत्येकी 10 असे 20 फेरीवाले प्रस्तावित
'राजगड'बाहेरील रस्त्यावर 200 फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित
दादरमध्ये नियमानुसार अत्यंत तुरळक फेरीवाल्यांना जागा प्रस्तावित
दादर-धारावीमधील जी नॉर्थ विभागात 4 हजार 455 फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित
तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरचा परिसर मात्र नो हॉकर्स झोनमध्ये
संबंधित बातम्या :
राज ठाकरे, आमीरच्या घराबाहेर फेरीवाला क्षेत्र, 'मातोश्री'बाहेर मात्र बंदी
मनसेच्या ‘कृष्णकुंज’वरील बैठकीत नेमकं काय ठरलं?
राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’बाहेरच फेरीवाले बसणार?
मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्या : रामदास आठवले
राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला : संजय निरुपमअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement