एक्स्प्लोर

खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केल्यास रिपोर्ट पालिका कळवणार! मुंबई महापालिकेचे नवे परिपत्रक

जर तुम्ही खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केली आणि जर तुमचा अहवाल पॉझिटिव्ह असेल तर त्याचा रिपोर्ट खासगी लॅब नाही तर मुंबई महापालिका कळवणार आहे. या संदर्भात महापालिकेने एक परिपत्रक जारी केले आहे.

मुंबई : जर तुम्ही खासगी लॅबमधून कोरोना चाचणी केली असेल तर त्याचा रिपोर्ट तुम्हाला खासगी लॅब नाही तर मुंबई महापालिका कळवणार आहे. रुग्णाचा कोविड रिपोर्ट जर पॉझिटीव्ह असेल तर तो त्याला न कळवता थेट महानगरपालिकेला कळवण्याचा आदेश महानगरपालिकेने जारी केला आहे. पण, या आदेशावर आता अनेक प्ररश्नचिन्ह उभी राहतायेत. खासगी लॅबकडून थेट रुग्णाला रिपोर्ट न कळवता महापालिकेला रिपोर्ट देण्यामागे रुग्णसंख्या लपवण्याचा हेतु तर नाही ना? असे प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित होत आहेत.

राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडी सुरु आहेत. मुंबईतल्या कोरोना मृतांचे आकडे दडवले असल्याचा आरोपही विरोधी पक्ष भाजपने केला आहे. त्यानंतर आता आणखी एक वाद सत्ताधारी आणि विरधकांमध्ये सुरू झालाय. तो म्हणजे महापालिकेनं कोरोना रिपोर्ट थेट रुग्णाला न कळवण्यासंबंधी जारी केलेल्या एका परिपत्रकावरुन.

काय आहे पालिकेचं नवं परिपत्रक
  • रुग्णाचा कोविड रिपोर्ट जर पॉझिटीव्ह असेल तर तो त्याला न कळवता थेट महानगरपालिकेला कळवण्याचा आदेश महानगरपालिकेने जारी केलाय. मात्र, रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर तो रुग्णाला परस्पर कळवला तरी चालेल.
  • रिपोर्ट महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर संबंधित यंत्रणा रुग्णापर्यंत ही माहिती पोहोचवेल. मात्र, या नव्या परिपत्ररकावर विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केलेत.
  • थेट रुग्णांना रिपोर्ट न कळवण्याच्या नव्या परिपत्ररकाबाबत कोणते आक्षेप आहेत?
  • स्वतःचा रिपोर्ट मिळणे हा रुग्णाचा अधिकार कसा काय हिरावून घेऊ शकता?
  • महानगरपालिकेची एकूणच कामाची पद्धत पाहता, त्या पॉझिटीव्ह रुग्णाला उपचार मिळण्यास दिरंगाई झाली आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोणाची?
  • रुग्णांची संख्या कमी दाखवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना?
कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयांनी भरती करुन घेऊ नये : राजेश टोपे महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण काय?
  • यासाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये 24 तास चालणाऱ्या वॉर रुम तयार केली आहे.
  • वॉर रुममधील डॉक्टरांमार्फत अहवालाच्या माहितीसोबतच इतर वैद्यकिय सुविधांबाबत रुग्णाला सूचना देतात.
  • तसंच, संबंधीत रुग्णाला गरजेनुसार हॉस्पिटल रुग्णणवाहिकेची सुविधा महापालिकेकडून देण्यात येते.
  • काही खासगी लॅब कोरोना रिपोर्ट देण्यात दिरंगाई करतात. त्यामुळे हा नियम करण्यात आल्याचा महापालिकेचा दावा आहे.

मात्र, पॉझिटिव्ह रुग्णाला उपचार मिळण्यास दिरंगाई झाली आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोणाची? कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना अशी शंका मनसेनं उपस्थित केलीय.

या आरोपांना उत्तर देताना रुग्णालात जलदगतीनं वैद्ययकिय सेवा मिळावी आणि खासगी लॅब-महापालिका आणि रुग्णांमधील समन्वय साधला जावा यासाठीच ही व्यवस्था केल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.

आधीच कोरोनामुळे नेमके किती मृत्यू झाले? मृतांच्या आकड्यात काही फेरफार आहे का? या प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळालेली नाहीत. त्यात पॉझिटीव्ह रिपोर्टची माहिती रुग्णांआधी प्रशासनाला देण्यामागे आणखी काही काळबेरं तर नाही यावर शंका उपस्थित होणं स्वाभाविकच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA Raids: जे मुंबई पोलिसांना वर्षभर जमलं नाही ते तुकाराम मुंढेंनी आठवड्याभरात करून दाखवलं, कँटिन चालकाला हिसका, 75 हजारांचा दंड
जे मुंबई पोलिसांना वर्षभर जमलं नाही ते तुकाराम मुंढेंनी आठवड्याभरात करून दाखवलं, कँटिन चालकाला हिसका, 75 हजारांचा दंड
Navnath Ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
BMC Demolition Action : भाजपच्या तक्रारीनंतर ठाकरेंचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अडचणीत! गोरेगावमधील घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार; कारवाईची नोटीस बजावली
भाजपच्या तक्रारीनंतर ठाकरेंचे नगरसेवक तुळशीराम शिंदे अडचणीत! गोरेगावमधील घरावर पालिकेचा बुलडोझर चालणार; कारवाईची नोटीस बजावली
Thane Honeytrap Case : मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात 1.39 कोटींच्या खंडणीचा गुन्हा! उद्योगपतीला ब्लॅकमेल करून उकळले कोट्यवधी रुपये
मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलविरोधात 1.39 कोटींच्या खंडणीचा गुन्हा! उद्योगपतीला ब्लॅकमेल करून उकळले कोट्यवधी रुपये

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Navnath Ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
Embed widget