देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर नवाब मलिक काय गौप्यस्फोट करणार? पत्रकार परिषदेआधी ट्वीट करत इशारा
देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर निशाणा साधला होता.यावर आज सकाळी 10 वाजता नवाब मलिक (Nawab Malik) पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत
Nawab Malik on Devendra Fadnavis : काल देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. यावर आज सकाळी 10 वाजता नवाब मलिक (Nawab Malik) पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत. काल फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मलिक यांनी म्हटलं होतं की, उद्या सकाळी फडणवीसांचं अंडरवर्ल्डशी असलेलं नातं उघड करणार आहे. तसेच, फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या साथीनं राज्य वेठीस धरलं होतं. असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. फडणवीस माझं नाव खराब करण्याचं काम करत आहेत. मागेही पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी माझ्या जावयाच्या घरात गांजा सापडला होता. याप्रकरणी माझी मुलगी तुम्हाला नोटीस पाठवत आहे, असंही मलिकांनी सांगितलं होता. त्यामुळं नवाब मलिक आज नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष लागून आहे. पत्रकार परिषदेआधी नवाब मलिकांनी ट्वीट करत इशारा दिला आहे.
उनकी नींद खो गई है,
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 10, 2021
अब चैन खोने का वक़्त आ गया है,
मिलते है आज सुबह १० बजे
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक बोलताना काल म्हणाले की, "देवेंद्रजी तुम्ही थेट बॉम्ब ब्लास्ट, दाऊद, अंडरवर्ल्डशी जोडून माझी प्रतिमा मलीन करण्याचं नाव करत आहात. काही दिवसांपूर्वी तुम्ही पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांच्या जावयाच्या घरी गांजा सापडला असं म्हणाला होतात. याप्रकरणी माझी मुलगी उद्या तुम्हाला नोटीस पाठवणार आहे. आरोप लावून तुम्ही माफी मागणार नसाल तर आम्ही आशा करतो की, या लढाईत तुम्ही माफी मागणार नाही, लढाई सुरुच ठेवू." तसेच पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "ही फाईल एनआयएकडे द्या किंवा सीबीआयकडे द्या, मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. जे आज मी बोलतोय, तो सगळा घटनाक्रम जसंच्या तसं घडला आहे. एनआयए असो किंवा सीबीआय चौकशी करो. त्यांना वाटेल नवाब मलिक घाबरणार. पण नवाब मलिक घाबरणार नाही."
उद्या सकाळी दहापर्यंत थांबा, फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड संबंधाचा पर्दाफाश करणार : नवाब मलिक
देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन होते. याचा खुलासा उद्या सकाळी मी करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की दिवाळीनंतर फटाके फोडू, पण मला वाटतं फटाके भिजले आणि वाया गेले. नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र देवेंद्रजी 1999 ला तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार म्हणून आलात. यापूर्वी मुंडे साहेबांनी अनेकांचे तार दाऊदशी जोडले. मात्र 62 वर्षांच्या कार्यकाळात किंवा 26 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप कोणी सिद्ध करु शकले नाहीत. मी कवडीमोल दराने जमीन माफियाकडून घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांना चुकीची माहिती कोणीतरी देतोय.. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्र दिले असते. अंडरवर्ल्डचा खेळ जो सुरु केला आहे, आज मी बोलणार नाही, मात्र उद्या सकाळी 10 वाजता देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आणि मुख्यमंत्री असताना सर्व शहराला ओलीस ठेवलं होतं त्याचाा पर्दाफाश करणार, असं मलिक म्हणाले.