राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही केवळ अफवा, उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास आतुर : नवाब मलिक
विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार अशा अफवा पसरवली जात आहे, यावर नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत पक्षाची भूमिका मांडली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ही केवळ अफवा आहे. ही अफवा विरोधक पसरवत असून ही चर्चा खोटी आणि बिनबुडाची आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जाणार अशा अफवा पसरवली जात आहे, यावर नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत पक्षाची भूमिका मांडली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन सार्वजनिक केली जाईल."
कुछ लोग 12 एनसीपी विधायकों की बीजेपी में जाने की अफवाह फैला रहें है, यह बे बुनियाद और मनगढन्त खबर है, उलट चुनाव से पहले बीजेपी में गए विधायक एनसीपी में लौटने के लिए आतूर हैं लेकिन इस पर अभी कोई फैसला नहीं हुआ है जल्द फैसला कर जानकारी सार्वजनिक की जाए गी ।@PTI_News @ani_digital
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 10, 2020
भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक : नवाब मलिक राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत असं सांगताना 2019 च्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा एकदा राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे. ते म्हणाले की, "आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणुकीच्या आधी भाजपात गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यास आतुर झाले आहेत. परंतु यावर कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र यावर लवकरच निर्णय होऊन त्याची माहिती दिली जाईल."
नवाब मलिक काय म्हणाले? "काही जण राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा पसरवत आहेत, त्यावर खुलासा आम्ही केला आहे. काही जणांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली. काही आमदार शरद पवारांना, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असंही नवाब मलिक म्हणाले. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे कोणते बडे नेते भाजपमध्ये? उदयनराजे भोसले - सातारा शिवेंद्रराजे भोसले - सातारा राणजगजितसिंह पाटील - उस्मानाबाद धनंजय महाडिक - कोल्हापूर बबनराव पाचपुते - श्रीगोंदा रणजितसिंह मोहिते-पाटील - माळशिरस मधुकर पिचड - अकोले गणेश नाईक - नवी मुंबई राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही केवळ अफवा, उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास आतुर : नवाब मलिक