एक्स्प्लोर

NCP MLA Disqualification Case : शरद पवारांच्या परवानगीने अजित पवारांनी शपथ घेतली होती, राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान सुनील तटकरेंचा दावा 

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. दरम्यान यावेळी दोन्ही गटातील  उलटतपासणी करण्यात येत आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची उलटतपासणी घेण्यात आली. अजित पवार यांनी 2019 मध्ये जी शपथ घेण्यात आली होती ती पक्षनेतृत्वाच्या म्हणजेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सहमतीनेच घेतली होती असा दावा यावेळी सुनील तटकरे यांनी केलाय. अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाच्या घडामोडींपैकी एक आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांची उलटतसापणी घेण्यात आली. यावेळी सुनील तटकरे यांनी हा दावा केला आहे. 

सुनील तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं?

अजित पवार गटाकडून विरेंद्र तुळजापूर हे युक्तिवाद करत आहे. तसेच शरद पवार गटाकडून शरण जेथयानी हे युक्तिवाद करतायत. आजची साक्ष आणि पवारांची उपस्थिती ह्या साठी महत्वाची आहे कारण सुनील तटकरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रता शरद पवार काही जणांचं ऐकतात आणि मनमानी पद्धतीने कारभार करतात म्हणून आम्ही वेगळं निर्णय घेतला होता असं म्हणाले होते. दरम्यान सुनील तटकरे यांना शरद पवार गटाच्या वकिलांांनी आपण या मताशी सहमत आहात का 2019 मध्ये शरद पवार हे भाजप सोबत जायचं नाही या मताचे नव्हते त्यांच्या मताशी अनेकजण सहमत होते असा सवाल केला. त्यावर सुनील तटकरे यांनी म्हटलं की,  त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती. पुढे वकिलांनीनी अनेक प्रश्नांची पुरवणी दिली. 

सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आज विधिमंडळाच्या आमदार अपात्रता सुनावणीसाठी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विधिमंडळाच्या कोनशिलेजवळ शरद पवारांसोबत फोटो काढला. या कोनशिलेचे अनावरण शरद पवार मुख्यमंत्री असताना झालं होतं. आज शरद पवार तब्बल 29 वर्षानंतर विधिमंडळामध्ये राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी उपस्थित होते.

वकील
आपण या मताशी सहमत आहात का 2019 मध्ये शरद पवार हे भाजप सोबत जायचं नाही या मताचे नव्हते त्यांच्या मताशी अनेकजण सहमत होते. 

तटकरे 
2019 ला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. पुढे काय झालं ते सर्वांना माहिती आहे. 

वकील
23 नोव्हेंबर 2019 रोजी जी अजित पवार यांनी शपथ घेतली त्यातून भाजप आणि राष्ट्रवादी युती झाली असा तुमचा समज आहे का

तटकरे
भाजप राष्ट्रवादी सरकार स्थापन झालं याचा अर्थ आमची युती झाली

वकील 
आपली साक्ष अशी आहे का की 23 नोव्हेंबर 2019 रोजी पक्षनेतृत्वाने शपथ घेण्यासाठी मान्यता दिली होती

तटकरे
हो

वकील
नेतृत्वाने मान्यता दिली ती कशी दिली होती

तटकरे 
मला माहिती नाही

सुनावणीदरम्यान काय झालं?

अजित पवार गटाते वकील - तुम्ही प्रतिज्ञापत्रात जे म्हटले आहे त्या बद्दल तुमचे काय मत आहे

सुनिल तटकरे- मला जे म्हणायचे आहे ते मी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

वकील - तुमच्या प्रतिज्ञापत्राचे शेवटचे पान पहा. ती कोणाची सही आहे

सुनिल तटकरे - ही माझी सही आहे.

शरद पवार वकील

तुम्ही पक्ष कधी जॉईन केला

तटकरे - 1999 साली मी पक्षात आलो. 

अजित पवार गटाचे वकील

वकील
त्यावेळी किती कार्यकर्ते पक्षात होते

सुनिल तटकरे - मला आठवत नाही

वकील - तुम्ही जे पुरावे दिले आहे. त्यात तुम्ही पक्षाचा मेंबर असाल उल्लेख केला आहे त्याचा अर्थ काय? 

सुनिल तटकरे - त्याचा अर्थ पक्षाचा पदाधिकारी.

वकील - असंतोष वाढत होता असे तुम्ही म्हणालात तो किती काळ चालला.

सुनिल तटकरे - 2014 पासून सुरू होता. तो नंतर 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर खूपच वाढला.

वकील शरद पवार गट रोहन जेतयानी - पार्टी लिडरशीप म्हणजे काय? 

सुनिल तटकरे - लिडर म्हणजे राज्य पातळीवर देश पातळीवरचे नेते.

वकील -30 जूनला जी बैठक झाली ती प्लॅन बैठक होती का? 

तटकरे - 30 तारखेला जी बैठक झाली होती ती व्यवस्थित निर्णय घेउन बोलावण्यात आली होती. आमदार खासदार यांना जे काही म्हणायचं आहे ते सांगण्यासाठी होती. 

वकील - ह्या बैठकीचे प्लॅनिंग कधी कऱण्यात आलं होत

तटकरे - पक्षांतर्गत विविध चर्चा होतात त्यावेळीं षनमुखानंद येथे बैठक झाली त्यावेळी कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या,  त्यामुळं आम्ही एक बैठक बोलवली. त्यामधे ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेतल्या जातील असं ठरवण्यात आलं. 

वकील  -21 जून 2023 ते 30 जून दरम्यान संबंधित बैठकीची तारीख ठरली? 

तटकरे - आमची तारीख अशी ठरली नव्हती. केवळ षनमुखानंद हॉल येथे झालेल्या बैठकीनंतर केवळ भेटायचं ठरल होतं. 

वकील - तुम्ही अशी बैठक घ्यावी अशी कूणी भुमिका मांडली त्याचं नाव सांगू शकाल का?

तटकरे - असं कुणाचं नाव सांगता येणारं नाही

तटकरे - परन्तु अनेक कार्यकर्त्यानी एकत्र येत भुमिका मांडली होती की बैठक घ्यावी. अनेक नेते त्यात सहभागी होतें

वकील - हा निर्णय राष्ट्रवादीचा विधीमंडळ पक्षातील नेत्यांनी घेतला की राजकिय पक्ष म्हणुन सहभागी नेत्यांनी घेतला

तटकरे - सगळ्यांनी मिळून बैठक घ्यावी असा निर्णय घेतला. 

वकील - ही बैठक ठरवण्याची जबाबदारी कुणावर होती

तटकरे - मी आधीच सांगितलं आहे की, सर्व केडर मधील नेत्यांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला. 

वकिल - या बैठकीचा दिवस ठरवण्याची जबाबदारी कुणाची होती?

तटकरे - मी आधीच सांगितलं होतं की पदाधिकाऱ्यांच्या असंतोष होता म्हणुन सर्वानुमते बैठक घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळं बैठक घेण्याला एक व्यक्ती जबाबदार नाही. 

वकील - तुम्हाला ही बैठक होतं आहे हे कूणी सांगितलं

तटकरे - मी आधीच उत्तर सांगितलं आहे

वकील - ह्या बैठकी बाबत वैयक्तिकरित्या कसं काय समजलं की बैठक होणार आहे

तटकरे - मी आधीच तुम्हाला सांगितल की पक्षात असंतोष होता त्यामुळं सगळ्यांनी भेटायला हवं असं ठरलं होतं. 

वकील - जी चर्चा 21 जूनला नेत्यांची झाली होती की आपण वेगळा निर्णय घ्यायला हवा यात तुम्ही होता का? 

तटकरे - मी होतों

वकील - अजित पवार सुद्धा या बैठकीत होतें

सुनिल तटकरे - अजित पवार यांनी या बैठकीत भाषणं केलं आणि सर्वांनी मिळून एकत्रित रित्या अजित पवार घेतं आसलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 

वकील - मी तुम्हाला पुन्हा विचारतोय की 30 जूनला जी बैठक झाली त्या बैठकीला अजित पवार होतें का?

तटकरे - ते आमचे नेते आहेत त्यामुळं ते तिथे होतेच

वकील - 21 जून ला जे बोलणं झालं, तेव्हा हे ठरलं होतं का की 30 जुन ला निर्णय घेतला जाईल, अजित पवारांना राष्ट्रिय अध्यक्ष करण्यासाठी?

तटकरे - 21 जून ला पक्षाची एक बैठक झाली होती त्यावेळीं अजित पवार यांनी भाषणं केलं त्याला प्रतिसाद मिळाला 

वकील - मी नेमका प्रश्न विचारतो आहे की 21 जूनला बैठक झाली त्याचवेळी अजित पवार यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला

तटकरे - नाही

21 जुनला शरद पवार हे देखील या केडरचा भाग होते का ज्याचा तुम्ही उल्लेख केला?

उत्तर : नाही. केडर मध्ये डिसकन्टेन्ट चा मुद्दा आहे. मग हा प्रश्न लागू कसा होतो.

वकील - त्यावेळीं शरद पवार हे राष्ट्रिय अध्यक्ष म्हणून मान्य होते का?

तटकरे - ते आधीच बैठक घेतं होतें

वकील - शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 21 जुनची बैठक घेत होतें का? 

तटकरे - हो 

वकील -  30 जुनची बैठक ही राष्ट्रवादीच्या घटनेला धरुन नव्हती असं तुम्ही उत्तरात लिहिलं आहे

तटकरे - हे असत्य आहे

वकील - 30 तारखेला जी बैठक झाली ती राष्ट्रवादीच्या घटनेच्या कोणत्या कलमानुसार झाली होती? 

तटकरे - अशी बैठक घेता येत नाही असे घटनेत कुठंही लिहिलेलं नाही.

- या बैठकीचा दिवस ठरवण्याची जबाबदारी कुणाची होती?

तटकरे - मी आधीच सांगितलं होतं की पदाधिकाऱ्यांच्या असंतोष होता म्हणुन सर्वानुमते बैठक घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळं बैठक घेण्याला एक व्यक्ती जबाबदार नाही. 

वकील - तुम्हाला ही बैठक होतं आहे हे कूणी सांगितलं

तटकरे - मी आधीच उत्तर सांगितलं आहे

वकील
ह्या बैठकी बाबत वैयक्तिकरित्या कसं काय समजलं की बैठक होणार आहे

तटकरे - मी आधीच तुम्हाला सांगितल की पक्षात असंतोष होता त्यामुळं सगळ्यांनी भेटायला हवं असं ठरलं होतं. 

वकील - जी चर्चा 21 जूनला नेत्यांची झाली होती की आपण वेगळा निर्णय घ्यायला हवा यात तुम्ही होता का? 

तटकरे - मी होतों

वकील - अजित पवार सुद्धा या बैठकीत होतें

सुनिल तटकरे - अजित पवार यांनी या बैठकीत भाषणं केलं आणि सर्वांनी मिळून एकत्रित रित्या अजित पवार घेतं आसलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 

वकील - मी तुम्हाला पुन्हा विचारतोय की 30 जूनला जी बैठक झाली त्या बैठकीला अजित पवार होतें का?

तटकरे - ते आमचे नेते आहेत त्यामुळं ते तिथे होतेच

वकील - 21 जून ला जे बोलणं झालं, तेव्हा हे ठरलं होतं का की 30 जुन ला निर्णय घेतला जाईल, अजित पवारांना राष्ट्रिय अध्यक्ष करण्यासाठी?

तटकरे - 21 जून ला पक्षाची एक बैठक झाली होती त्यावेळीं अजित पवार यांनी भाषणं केलं त्याला प्रतिसाद मिळाला 

वकील - मी नेमका प्रश्न विचारतो आहे की 21 जूनला बैठक झाली त्याचवेळी अजित पवार यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला

तटकरे - नाही

21 जूनला शरद पवार हे देखील या केडरचा भाग होते का ज्याचा तुम्ही उल्लेख केला?

उत्तर: नाही. केडर मध्ये डिसकन्टेन्ट चा मुद्दा आहे. मग हा प्रश्न लागू कसा होतो.

वकील - त्यावेळीं शरद पवार हे राष्ट्रिय अध्यक्ष म्हणून मान्य होते का?

तटकरे - ते आधीच बैठक घेतं होतें

वकील - शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 21 जुनची बैठक घेत होतें का? 

तटकरे - हो 

वकील -  30 जुनची बैठक ही राष्ट्रवादीच्या घटनेला धरुन नव्हती असं तुम्ही उत्तरात लिहिलं आहे

तटकरे - हे असत्य आहे

वकील - 30 तारखेला जी बैठक झाली ती राष्ट्रवादीच्या घटनेच्या कोणत्या कलमानुसार झाली होती? 

तटकरे - अशी बैठक घेता येत नाही असे घटनेत कुठंही लिहिलेलं नाही.

वकील - 30 तारखेला जो ठराव पास करण्यात आला त्यावेळीं आमदार खासदार व्यतिरिक्त इतर कुठल्या पदाधिकाऱ्याने 30 तारखेच्या ठरवावर सही केली आहे का? 

तटकरे - प्रतिज्ञापत्रात सगळ्यांची नावे त्यांची पदे नमूद आहेत

वकील - तुम्ही पाठिंब्याच्या पत्रावर सह्या करणाऱ्या लोकांना प्रयक्ष पाहिलं का? 

तटकरे - होय

वकील - संबंधित बैठक किती काळ सुरू होती?

तटकरे - सकाळीं 11.30ला सूरू होती आणि 12 वाजता संपली

वकील - निवडणूक आयोगासमोर जी परिच्छे 15 नुसार याचीका दाखल केली ज्या मधे पक्ष आणि चिन्ह याबाबत यचिका दाखल करावी असा निर्णय झाला का?

तटकरे - हा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला

वकील - तुम्हीं वकिलांना याचिका दाखल करण्यासाठी सूचना दिली का? 

तटकरे - सगळ्यांनी मिळुन निर्णय घेतला आणि सुचना दिल्या

परिच्छेद 27 आणि 28 अंतर्गत याचिका दाखल करण्यासाठीं ज्या सूचना देण्यात आल्या त्या कुठून देण्यात आल्या? कुणाच्या 5माध्यमातुन देण्यात आल्या

तटकरे - वकिलांच्या माध्यमातुन सूचना देण्यात आल्या हे स्वाभाविक आहे त्यामुळं हा प्रश्नच योग्य नाही

वकिल- निवडणुक आयोगा समोर परिछेद 15 खाली जी याचिका दाखल केली गेली त्यासाठी कोणी एका व्यक्तीने सांगितले का? 

सुनिल तटकरे- हा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला होता.

वकिल- वकिलांना मसुदा तयार करण्यात तुमचा सहभाग होता का? 

सुनिल तटकरे- सगळ्यांनी मिळून ठरविले. सगळे म्हटले म्हणजे त्यात माझा सहभाग होताच. 

वकिल- परिछेद 27-28 मध्ये याचिका करण्यासाठी असा मसुदा तयार करण्यासाठी कोणी आणि कधी इस्ट्रक्शन दिल्या. 

( अजित पवार गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला.) 

सुनिल तटकरे - ही गुप्त माहिती आहे जी वकिल आणि अशिल यातील आहे. ते सांगणे योग्य नाही. 

वकिल- हा मसुदा तयार करण्यासाठी तुम्ही बैठकीतून सांगितले, वकिलाच्या कार्यालयात जाऊन सांगितले की ते तीसऱ्या कुठल्या जागी दिले गेले. 

सुनिल तटकरे- मला आठवत नाही.

वकिल- तुम्ही निवडणुक आयोगाकडे जी याचिका दाखल केली होती त्याचा मसुदा ही दाखल करण्यापूर्वी पाहिला होता का? 

सुनिल तटकरे- मला आठवत नाहीं 

वकिल- तुम्हाला कसे कळले की 30 तारखेला ही पीटीशन दाखल झाली. 

सुनिल तटकरे- बैठकीतून कळले. 

वकिल- तुन्ही हे कागतपत्र पहा. यात कुठेही असे का लिहिलेले नाही की 30 तारखेच्या बैठकीत अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे का म्हटले नाही. 

सुनिल तटकरे- मला माहिती नाही.

वकिल- तुम्हाला हे ठराव कुठे संमत झाले हे माहिती आहे का? जे निवडणुक आयोगाला कधी सादर करण्यात आले आहे. 

सुनिल तटकरे- 30 जूनला

जर तुम्ही 30 तारखेला याचिका केली मग त्यावर 5 जुलैचा शिक्का कसा काय आहे? 

तटकरे - मला माहिती नाही


वकील
30 जूनच्या पाठींबा पत्र आणि ठराव यावर तारीख नाही हे तुमच्या लक्षात आलं नाही का? 

तटकरे - ज्या दिवशी आम्ही ठराव पास केला त्याचं दिवशी आम्ही यचीका निवडणूक आयोगात दाखल केली

वकील
30 जूनला आणखी काही ठराव पास केला होता का? 

तटकरे - मला आठवत नाही

वकिल - तूम्ही बैठकीत असताना अनिल पाटील यांना राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद म्हणुन कायम ठेवण्याचा निर्णय करण्यात आला हे बरोबर आहे का? 

तटकरे - मला नेमका प्रश्न विचारा म्हणजे मला आठवेल. त्यावेळीं अनिल पाटील यांना मुख्य प्रतोद पदी कायम ठेवण्याचा ठराव पास करण्यात आला होता. मला हे आत्ता आठवलं

वकील
अनिल पाटील यांना मुख्यप्रतोद म्हणुन कायम ठेवण्याचा लेखी का ठराव नाही? 

तटकरे- मला माहिती नाहीं

वकील
तुम्हाला आत्ता एक पत्र दाखवण्यात आलं आहे ते दिलं गेलं आहे याची तुम्हाला माहिती आहे का? 

तटकरे - हो

वकील
आपल्याकडे 30 जुनला बैठक झाली त्यावेळीं अर्ध्या तासात 3 ठराव पास करण्यात आले आणि म्हणजेच साडे अकरा ते 12 पर्यंत मीटिंग पार पडली आणि त्यानंतर 12.30 वाजता अनिल पाटील हे मुख्यप्रतोद पदी कायम राहतील हे पत्र विधीमंडळत कसं काय? तुम्ही 20 ते 25 मिनिटांत पत्र तयार करुन दिलं कसं काय? 

तटकरे- मी साडे अकरा ते बारा ला मिटींग झाली असं म्हटल आहे. मी हे म्हणालो नाही की 11.30 ते 12.30 चा दरम्यान ठराव पास झाले.

वकील
प्रफुल पटेल यांची दोन्हीं ठरावावर साही नाही? 

तटकरे - जे कागदपत्र मला दाखवले त्यावर प्रफुल्ल पटेल यांची सही नाही

वकील - तुम्हाला असे म्हणायचे आहे की, त्या कथित बैठकीला उपस्थित नव्हते की, उपस्थित असताना देखील सही केली नाहीं

तटकरे - मी असं कुठेच म्हटलं नाही

वकील 
5 जुलैला राष्ट्रिय कार्यकारणीची बैठक घेत आहात याची एखादी नोटिस किंवा परिपत्रक प्रसिध्द करण्यात आलं होतं का? 

तटकरे - प्रत्येकाला कळवल होतं

वकील - म्हणजे तूम्ही कोणतही प्रसिद्ध पत्रक किंवा नोटीस काढली नव्हती? 

तटकरे - मी म्हणलो आहे की प्रत्येकाला कळवल होतं. 

वकील - तुम्ही राष्ट्रीय कर्यकरणीत केलेल्या एखाद्या ठरवावर सही केली होती का? यामधे अजित पवार यांना राष्ट्रिय अध्यक्ष, प्रफुल पटेल यांना राष्ट्रिय कार्याध्यक्ष आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष करावं याचा समावेश आहे 

तटकरे - सर्वांनी हातवर करुन मान्यता दिली होती. तशीच प्रथा आहे.

वकिल - तुम्हाल  rank and file of ncp party  म्हणजे काय? 

सुनिल तटकरे- म्हणते सर्व स्तरावरचे पदाधिकारी यांना भाजप बरोबर जायची मत बनले होते. 

वकिल- तुम्ही जे कथित भाजप बरोबर जाण्याबद्दल मत बनले होते म्हणाले असे होतात ते २०१९ पासून होते की नंतर झाले. 


सुनिल तटकरे- २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जेंवहा सरकार बनविण्यासाठी प्रयत्न होऊ लागले होते. 

वकिल- परिछेद २२ मध्ये म्हटल्याप्रमाणे कोणत्या बैठकीत असे कथित मत तयार झाले. 

सुनिल तटकरे- त्यावेळी बैठकांमधून 

वकिल- या कोणत्या बैठका होत्या? 

सुनिल तटकरे- कार्यकारी समिती आणि राष्ट्रीय कार्यकारणी या काळात झाल्या नाही. काही विधीमंडळ पक्षाच्या बैठकामध्ये काही वेळा भाजपबरोबर जायचे ठरले काही वेळा नाही ठरले.

वकील
आपण या मताशी सहमत आहात का 2019 मध्ये शरद पवार हे भाजप सोबत जायचं नाही या मताचे नव्हते त्यांच्या मताशी अनेकजण सहमत होतें 

तटकरे - 2019 ला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. पूढे काय झालं ते सर्वांना माहिती आहे

वकील.23 नोव्हेंबर 2019 रोजी जी अजित पवार यांनी शपथ घेतली त्यातून भाजप आणि राष्ट्रवादी युती झाली असा तुमचा समज आहे का

तटकरे - भाजप राष्ट्रवादी सरकार स्थापन झालं याचा अर्थ आमची युती झाली

वकील 
आपली साक्ष अशी आहे का की 
23 नोव्हेंबर 2019 रोजी पक्षनेतृत्वाने शपथ घेण्यासाठी मान्यता दिली होती त्यातुन

तटकरे - हो

वकील
नेतृत्वाने मान्यता दिली ती कशी दिली होती

तटकरे - मला माहिती नाही


वकिल- तुम्ही जे २२ परिछेदात म्हणालात त्याची पहिली ओळ ही चुकीचे उत्तर दिले आहे.

वकील
शरद पवार यांनी भाजप सोबत जायचं नाहीं हा निर्णय घेतला होता त्याला तुम्ही विरोध केला होता का? 

तटकरे - त्यावेळीं तशी परिस्थिती नव्हती

वकील
पक्ष प्रमुखांच्या निर्णयाविरोधात पक्षातील इतर कोणी हरकत घेतली होती का? 

तटकरे - त्यावेळीं पक्षात काहीजणांचा शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध होता. 

वकील - पक्षातील काही लोकं असहमत होती तरी त्यांनी भाजप सोबत न जाण्याचा निर्णय स्वीकारला..

तटकरे - हो

वकील
ज्या लोकांनी निर्णयाचा विरोध केला यांच्या पैकी कोणी महाविकास आघाडी सरकार काळात मंत्री होत्ते का? 

तटकरे
सांगता येणार नाही

वकील
याचा अर्थ असा की आपल्यालाही हे ही माहिती नाही की नेमकी कोण शरद पवार यांच्या निर्णयाच्या विरोधात होती

तटकरे - प्रश्न चुकीचा आहे

वकील
महाविकास आघाडी सरकार मध्ये राष्ट्रवादीचे 10 कॅबिनेट आणि 4 मंत्री होतें.

तटकरे - हो

वकील
त्यावेळीं मंत्री असणारे आता अजित पवार ग्रुप मध्ये सहभागी आहेत

तटकरे - हो

वकील
म्हणजे तुमचं म्हणण आहे की सध्या जे दोन गट पडले आहेत त्यातील एका गटात सध्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असणारे आता देखील मंत्री आहेत

तटकरे- मी ग्रुप मानत नाही. आमचा पक्ष आहे. 

वकील
तटकरे यांनी इलेक्शन कमीशनला प्रतिज्ञापत्र दिलं आहे सोशल मीडिया हॅण्डल आणि अकाउंट याबाबत माहिती दिली आहे. ज्या खात्यांची माहिती दिली आहे ती तुमचीच आहेत का? 21 जून पर्यंत तुम्ही शरद पवार राष्ट्रिय अध्यक्ष आहेत म्हणुन ट्विट केले आहेत

तटकरे
हो

21 जुन 2023 ला तुम्हाला बोलण्याची संधी दिली होती का?

उत्तर: होय मला बोलण्याची संधी दिली होती. 

हे ट्विट तुम्हीच पोस्ट केले आहेत का.?

उत्तर: मला पडताळणी करावी लागेल

शरद पवार यांनी निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली 2 मे, होती तेव्हा तुम्ही विडिओ पोस्ट केला होता?

उत्तर: कोणता विडिओ? मला आठवत नाही.


तुम्ही दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होतात का?

उत्तर: मला आठवत नाही काय कार्यक्रम होता, युवक कार्यक्रम असावा 

10 सप्टेंबर 2022 नॅशनल जनरल सेक्रेटरी (राष्ट्रीय सरचिटणीस) म्हणून जाहीर झाल होत का?

उत्तर: मला आठवत नाही, पण माझी नेमणूक झाली होती.

कोणी तुमची निवड सरचिटणीस म्हणून केली?

उत्तर: तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी

वकील
राष्ट्रीय कार्यकारणीचा कार्यक्रमात खजिनदार म्हणून नियुक्त्या झाल्या होत्या त्या तुम्ही पाहिल्या होत्या का? 

तटकरे - हो 

वकील
तुम्ही सहमत आहात का  की याच कार्यक्रमात वर्किंग कमिटी मेंबर आणि राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून आपली घोषणा झाली

तटकरे
हो


वकील
तुम्हीं वर्किंग कमिटीच्या बैठका उपस्थीत होता

तटकरे
आठवतं नाही

वकील
तुमचा आधी भास्कर जाधव अध्यक्ष होते

तटकरे
हो

वकील
त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला अध्यक्षपद मिळालं

तटकरे
त्यांनी राजीनामा दिला होता म्हणून नवीन नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ पुर्ण झाला नव्हता. परंतु त्यांनी राजीनामा दिला म्हणून राज्याची एक बैठक झाली आणि त्यात मला नियुक्त करण्यात आलं..

वकील
हे खरं आहे का की तुम्हाला प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी मिळाली ती निवडणुकीच्या माध्यमातुन मिळाली होती 

तटकरे
2015 साली मला प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. मी निवडून आलो होतो.


वकील
तुम्हाला 2015 साली एकमेव प्रदेशाध्यक्ष पदासाठी नामांकन मिळालं होतं का? 

तटकरे
हो 

वकील
तुमच्या निवडणुकीचा एबी फॉर्म जयंत पाटील यांच्या सहीचा होता.

तटकरे
हो कारण ते लोकनियुक्त प्रदेशाध्यक्ष होते.

23 जुन, 2023 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली तुमची राष्ट्रीय खजिनदार म्हणून नेमणूक केली होती का?

उत्तर: हो

2019 लोकसभा निवडणूकी आधी तुम्ही जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर प्रश्न उपस्थित केला का?

उत्तर: नाही. त्यांनी मला बी फॉर्म दिला

 तुम्ही प्रदेशाध्यक्ष यांच्या पदा बदल कधी प्रश्न उपस्थित केले होते का?

उत्तर: तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला न्हवता.

हेही वाचा : 

राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता, नवं वेळापत्रक अध्यक्षांकडून जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget