NCP Crisis : पक्ष आणि चिन्ह गेलं, आता कार्यालय जाणार; आदेश येताच पक्ष कार्यालय ताब्यात घेणार, अजित पवार गटाने दंड थोपटले
NCP Political Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर आता लवकरच पक्ष कार्यालयेही शरद पवार गटाच्या ताब्यातून निसटणार आहेत.
Amol Mitkari on NCP News Update : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्ष (Pollitical Party) आणि चिन्ह (Symbol) अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे गेलं आहे. अजित पवार गट आदेश येताच पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिला आहे. यासोबत चिन्हही अजित पवार गटाकडे (Ajit Pawar Group) गेलं आहे. पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर आता लवकरच पक्ष कार्यालयेही (NCP Office) शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) ताब्यातून निसटण्यााची चिन्हं दिसत आहेत. लवकरच अजित पवार गटाकडून पक्ष कार्यालयेही ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे.
आदेश येताच पक्ष कार्यालय ताब्यात घेणार
वरिष्ठ पातळीवरून आदेश येताच लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ असं अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे. मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'राष्ट्रवादी पक्ष कार्यालये ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत. वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की, लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ. सध्या पक्ष चिन्ह आम्हाला मिळालं, त्यामुळं आपसूक पक्ष कार्यालयं आमच्या बाजूला येईल.'
राज ठाकरेंवर खोचक टीका
राज ठाकरेंवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला, पण त्यांना किती यश मिळालं, हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी त्यांच्या आमदाराला धरुन राहावं, त्याने काही निर्णय घेतला तर हिमालयात जावं लागेल, असं म्हणत मिटकरींनी खोचक टीका केली आहे.
मनसेच्या प्रश्नावर अजित पवार गटाचं उत्तर
दरम्यान, मनसेच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मिटकरी म्हणाले की, 'पेड ट्रोलर सध्या व्हिडिओ व्हायरल करत आहेत. आम्हाला कोण, काय म्हणतं, हे महत्त्वाचं नाही, जनतेची कामं आम्हाला करायची आहेत.' एकनाथ शिंदेंनी बंड केल्यावर अजित पवारांनी त्यांच्यावर टीका केली होती. तोच व्हिडीओ व्हायरल करत 'कशाला दुसऱ्याचा पक्ष ताब्यात घेतला', अस सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला होता.
मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे. मला पक्षाचा वरिष्ठांनी सांगितलं आहे, त्यांच्यावर बोलू नका. अजित पवार यांच्या विरोधात एक टोळकं काम करत होतं, त्याचा म्होरक्या जितेंद्र आव्हाड आहे. त्यांनी मुंब्रा हातात राहतो का हे पाहावं, असं मिटकरी म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :